Gram Rojgar Sahayak Salary Hike: ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी आनंदाची बातमी; 'पगार' वाढला, प्रवासभत्ता, डेटा पॅकचीही सुविधा

ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
Gram Rojgar Sahayak Salary Hike
Gram Rojgar Sahayak Salary HikePUDHARI
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आता या सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन, वर्षाला किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे लक्ष्य आणि १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवस निर्माण करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत नवीन नियमावली शासनाने जाहीर केली आहेत. (Gram Rojgar Sahayak Salary Hike)

Gram Rojgar Sahayak Salary Hike
Sinhgad Technical Education Society Salary: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या १,२०० कर्मचाऱ्यांना दिलासा; २७.९१ कोटींची शुल्क प्रतिपूर्ती जमा करण्याचे आदेश

भरत गोगावलेंनी केला होता पाठपुरावा

मृद व जलसंधारण (रोहयो) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन आणि सेवा अटींबाबत पाठपुरावा केला होता.

सहा महिन्यांत ३ हजार मनुष्यदिवस नवीन निकषांनुसार प्रत्येक ग्राम रोजगार सहाय्यकाला वर्षभरात किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत किमान ३ हजार मनुष्यदिवस निर्मिती अपेक्षित आहे.

Gram Rojgar Sahayak Salary Hike
Municipal contract workers salary delayed : तब्बल दोन महिन्यांपासून रखडले मनपा कंत्राटी कामगारांचे वेतन

प्रवासभत्ता आणि डेटा पॅकचीही सुविधा

वर्षभरात १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवसांची निर्मिती करणाऱ्या सहाय्यकांना २ टक्के प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. त्यासोबत प्रवासभत्ता आणि डेटा पॅकची सुविधाही स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.

Gram Rojgar Sahayak Salary Hike
Judicial Staff Salary Issue: राज्यातील न्यायिक कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी नाही!

काम बंद काळातही मानधन

वर्षातील दोन महिन्यांच्या ‘पॉज कालावधीत’ जॉब कार्ड पडताळणी, ई-केवायसी आणि अन्य कार्यालयीन कामांसाठी दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

ग्राम रोजगार सहाय्यकाची निवड दरवर्षी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत केली जाईल. ही निवड १ सप्टेंबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी असेल आणि निवड प्रक्रियेवर ग्रामसभेचे नियंत्रण राहणार आहे.

Gram Rojgar Sahayak Salary Hike
Apple CEO salary: ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस यांना किती मिळणार पगार?

३० जून २०२७ पर्यंत प्रायोगिक अंमलबजावणी

नवीन निकष ३० जून २०२७ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर लागू राहतील. या कालावधीत कामगिरीचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमीच्या कामांची नोंद, जॉब कार्ड पडताळणी आणि रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेत ग्राम रोजगार सहाय्यकांची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news