Apple CEO salary: ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस यांना किती मिळणार पगार?

ॲपलने नवे सीईओ जॉन टर्नस यांच्या पगाराबाबत आणि शेअर्सवर आधारित मोबदल्याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
Apple CEO John Ternus
Apple CEO John TernusFile Photo
Published on
Updated on

Apple new CEO salary

नवी दिल्ली: नुकतेच जॉन टर्नस यांनी टिम कुक यांच्याकडून ॲपल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यासोबतच, ॲपलने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नवीन पगाराबाबत आणि शेअर्सवर आधारित मोबदल्याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

नवे सीईओ जॉन टर्नस यांना या आर्थिक वर्षात तब्बल ५८ कोटी डॉलर (सुमारे ५५१ कोटी रुपये) इतका मोबदला मिळणार आहे. दुसरीकडे, कार्यकारी अध्यक्ष या नवीन भूमिकेत टिम कुक यांना सुमारे ४७ कोटी डॉलर (सुमारे ४४६ कोटी रुपये) मिळतील.

Apple CEO John Ternus
Nitin Gadkari: देशातील सर्व राज्यांमध्ये धावणार बाईक टॅक्सी? नितीन गडकरींची नवीन योजना तयार; वाहतूक नियमांबाबत मोठी घोषणा

जॉन टर्नस यांना किती वेतन?

'यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन'ला दिलेल्या माहितीत ॲपलने दोन्ही अधिकाऱ्यांच्या नवीन वेतनाची आकडेवारी स्पष्ट केली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी जॉन टर्नस यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला, त्याच दिवशी ही माहिती समोर आली. जॉन टर्नस यांच्या नवीन पे पॅकेजमध्ये ३० लाख डॉलरच्या वार्षिक वेतनाचा समावेश आहे. याशिवाय, पुढील आर्थिक वर्षासाठी त्यांना सुमारे ५५ कोटी डॉलरचे स्टॉक अवॉर्ड्स (शेअर्सच्या स्वरूपातील मोबदला) दिले जातील.

टिम कुक यांना आता वर्षाला २० लाख डॉलर वेतन मिळेल. तसेच आर्थिक वर्ष २०२७ साठी त्यांना सुमारे ४५ कोटी डॉलरचे स्टॉक अवॉर्ड्स दिले जातील. सीईओ असताना टिम कुक यांना ३० लाख डॉलर वार्षिक वेतन मिळत होते.

सीईओ असताना कुक यांना मिळाले होते ७.४३ कोटी डॉलर

२०२५ मध्ये सीईओ म्हणून टिम कुक यांना एकूण ७ कोटी ४३ लाख डॉलर मिळाले होते. यात ३० लाख डॉलर वेतन, १ कोटी २० लाख डॉलरचा कामगिरीवर आधारित रोख पुरस्कार आणि ५ कोटी ७५ लाख डॉलरचे शेअर्स समाविष्ट होते.

Apple CEO John Ternus
UN report: मुंबई-कोलकाता पाण्यात बुडणार? समुद्राची पातळी वाढली, संयुक्त राष्ट्राचा धडकी भरवणारा अहवाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news