Municipal contract workers salary delayed : तब्बल दोन महिन्यांपासून रखडले मनपा कंत्राटी कामगारांचे वेतन

ऐन सणासुदीत कोंडी; एजन्सीने दिले बिल न मिळाल्याचे कारण
Chhatrapati Sambhajinagar bus service
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

Municipal contract workers' salaries have been delayed for two months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या सुमारे २१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. तिसरा महिना अर्ध्यापेक्षा अधिक उलटूनही पगार न झाल्याने ऐन गणेशोत्सव आणि पाठोपाठ येणाऱ्या सणांच्या काळात या कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून बिल मिळाले नसल्याने वेतन करता आले नसल्याचा मुद्दा मनुष्यबळ पुरवठा एजन्सीकडून समोर आला आहे. मात्र, महापालिकेचे बिल मिळाले नसले तरी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या तारखेला वेतन देणे एजन्सीला बंधनकारक आहे.

Chhatrapati Sambhajinagar bus service
Mukutban-Gadchandur railway line : मुकुटबन-गडचांदूर नवीन रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

महापालिकेच्या विविध विभागांतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी सध्या सुमारे २१०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पुरवठा आणि वेतनासाठी महापालिकेने चार वेगवेगळ्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सींची नियुक्ती केली आहे. मात्र, एजन्सी आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतन अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.

तसेच गणेशोत्सव सुरू असून, त्यापाठोपाठ विविध सण येत आहेत. त्यामुळे सध्या कुटुंबाच्या खर्चात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सलग दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण आणि सणांचा खर्च भागविण्याचा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवरही आर्थिक संकट ओढवले आहे.

मात्र मनपाकडून बिल मिळाले नसल्याचे कारण एजन्सीकडून सांगितले जात असले, तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या तारखेला करणे एजन्सीला बंधनकारक आहे. त्यामुळे बिलाच्या प्रक्रियेला विलंब झाला असला, तरी त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar bus service
Accident News : मिक्सरच्या चाकाखाली सापडलेल्या तरुणाचा मृत्यू; ईएसआयसी रुग्णालयासमोरील घटना

दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने संबंधित एजन्सी आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात वेतन रखडल्याने प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित एजन्सींना जाब विचारावा आणि थकीत वेतन त्वरित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

वेळेत वेतन देणे बंधनकारक एजन्सीने सादर केलेल्या बिलाची तपासणी करून देयक अदा करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू असते. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या तारखेलाच करणे एजन्सीला बंधनकारक आहे.
- विकास नवाळे, उपायुक्त, कामगार विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news