Mumbai Shooting Case: ती, तो आणि त्याची प्रेयसी; प्रेमाच्या त्रिकोणातून गोवंडीत भरदिवसा गोळीबार, 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Govandi Crime: प्रियकर व एका महिलेला अटक; शस्त्र पुरवठ्याचा शोध सुरू, बैंगणवाडीत भीतीचे वातावरण
भरदिवसा गोळीबारात 19 वर्षीय तरुणीची हत्या
भरदिवसा गोळीबारात 19 वर्षीय तरुणीची हत्याFile Photo
Published on
Updated on

मुंबई : गोवंडी येथे राहणाऱ्या शिफा शेख या 19 वर्षीय तरुणीची मंगळवारी भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर नदीम व तबस्सूम या महिलेला अटक करण्यात आली आहे. चौकशीत तिहेरी प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

भरदिवसा गोळीबारात 19 वर्षीय तरुणीची हत्या
Baba Siddique MCOCA Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात 27 आरोपींवर आरोप निश्चित; 24 फेब्रुवारीपासून खटला सुरू

ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, कमला रमण नगर परिसरात घडली. याच परिसरात शिफा ही तिच्या कुटुंबीयांसोबत राहात असून तिचे वडील बांधकाम कंत्राटदार आहेत. शिफाचे नदीमशी, तर नदीमचे तबस्सूम नावाच्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या तिहेरी प्रेमसंंबंधांतून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून मंगळवारी दुपारी बारा वाजता शिफावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. त्यात तिच्या मानेला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली होती.

भरदिवसा गोळीबारात 19 वर्षीय तरुणीची हत्या
BMC NCP Alliance: मुंबई महापालिकेत शिवसेना-दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अमेय घोले गटनेते

रक्तबंबाळ झालेल्या शिफाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिफाचा मृतदेह नंतर राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

भरदिवसा गोळीबारात 19 वर्षीय तरुणीची हत्या
Mumbai Air Quality Index 2026: देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मुंबई तिसरी; नवी मुंबईचीही हवा ‘खराब’ श्रेणीत

गोळीबाराची माहिती मिळताच परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाला वेग दिला. शिफाच्या कुटुंबीयांच्या जबानीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी तिचा प्रियकर नदीम यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत शिफावर तबस्सूमने गोळी झाडल्याची माहीती समोर आली. ती मात्र गोळीबारानंतर ती पळून गेली होती. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. पळून गेलेल्या तबस्सूमलाही अटक करण्यात आली आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलची तपासणी सुरू आहे. या दोघांच्या अटकेनंतर तिहेरी प्रेमसंबंधातून त्यांच्यात वाद होते. यातूनच गोळी झाडून या तरुणची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल कुठून आले याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात शस्त्र पुरवठ्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

या गोळीबारामुळेे बैंगणवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपी महिलेलाही अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news