Mumbai Air Quality Index 2026: देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मुंबई तिसरी; नवी मुंबईचीही हवा ‘खराब’ श्रेणीत

एक्यूआय 150 च्या पुढेच; दिल्ली-कोलकात्यानंतर मुंबईत प्रदूषणाची गंभीर स्थिती
Mumbai Air Quality
Mumbai Air QualityPudhari
Published on
Updated on

मुंबई: देशभरातील आठ प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. आर्थिक राजधानीपाठोपाठ नवी मुंबईचा क्रमांक लागतो.

Mumbai Air Quality
Mumbai BMC Budget 2026-27: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला; आकारमान 80 हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता

हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) संकेतस्थळाच्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये (एक्यूआय 208) सर्वाधिक प्रदूषण आहे. त्यानंतर कोलकाता (204) शहराचा नंबर लागतो. दोन्ही शहरांतील प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी अतिघातक हवेच्या कॅटेगरीमध्ये आहे. मुंबईची परिस्थिती त्याहून वेगळी नाही. येथे मंगळवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 187 इतका नोंदला गेला. नवी मुंबईची (168) हवासुद्धा खराब आहे.

Mumbai Air Quality
ZP Results Analysis Maharashtra: जिल्हा परिषदेत भाजपची ग्रामीण मुसंडी; कोकणात ठाकरे गटाचे गड कोसळले

मुंबईमध्ये मंगळवारी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके होते. पारा विशीच्या आत असल्याने थंडी कायम आहे. गारवा कायम असल्याने वाढते प्रदूषण आहे. बुधवारी 19 अंश सेल्सिअस किमान तापमान अपेक्षित असल्याने प्रदूषणाचा टक्का वाढलेला राहील, असे भारतीय हवामान विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले आहे.

Mumbai Air Quality
Hindi Language Controversy Maharashtra: ‘हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा’; राज ठाकरे यांचा मोहन भागवतांवर जोरदार निशाणा

प्रमुख शहरे : एक्यूआय

नवी दिल्ली: 265

कोलकाता : 217

मुंबई : 171

नवी मुंबई : 168

Mumbai Air Quality
Maharashtra Farmer Suicide: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात विशेष टास्क फोर्स; महाराष्ट्र देशात पहिले राज्य

1 जानेवारीपासून मुंबईची हवा सातत्याने श्वास घेण्यास लायक नसल्याचे एक्यूआय कॅलेंडर सांगते. या नवीन वर्षात एक्यूआय सतत 150 च्या पुढे राहत आला असून अनेकदा तो 200 किंवा त्यापुढे गेल्याचे दिसते. उदा. 4 जानेवारीला 203 आणि 26 जानेवारीला 202 एक्यूआय होता.

मुंबईतील खराब हवेच्या ठिकणी श्वास घेणे म्हणजे दिवसाला साडेतीन सिगारेटी ओढण्यासारखे आहे, असे एक्यूआयचे संकेतस्थळ सांगते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news