Goregaon Water Supply: गोरेगाव परिसरात 24 तास पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी जोडणीचे काम; काही भागांत पूर्ण तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी
Water
WaterPudhari
Published on
Updated on

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्ता भागात येणाऱ्या 750 मिलीमीटर व्यासाच्या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम मंगळवार दिनांक 10 मार्च ते बुधवार 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे.

यामुळे 24 तासांच्या कालावधीत ‌‘पी पूर्व‌’ आणि ‌ ‘पी दक्षिण‌’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

Water
Antop Hill Death Case: प्रियकराचा चारित्र्यावर संशय, सहा पानी चिठ्ठी लिहित मुंबईत तरुणीने संपवले जीवन; प्रियकराला अटक

नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Water
Indian Export Containers: मध्यपूर्व युद्धामुळे 45 हजार भारतीय कंटेनर अडकले

कमी दाबाने पाणीपुरवठा

मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग व आर्य भास्कर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री 12.00 ते मध्यरात्री 03.00) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Water
Maharashtra CET: सीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळल्यास थेट बंदी

पाणीपुरवठा बंद

शिवशाही प्रकल्प (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ : रात्री 11.45 ते पहाटे 05.45) पाणीपुरवठा बंद राहील, तर श्रीकृष्ण नगर, इंदिरा गांधी संशोधन संस्था (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ : मध्यरात्री 03.30 ते सकाळी 09.00) पाणीपुरवठा बंद राहील.

सॅटेलाईट टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान, फिल्मसिटी मार्गालगतचा परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ : रात्री 12.00 ते मध्यरात्री नंतर 03.00) पाणीपुरवठा बंद राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news