Mumbai Local Train Update: गोरेगाव ते सीएसएमटी लोकल सेवा तीन महिने बंद; पश्चिम रेल्वे प्रवाशांना मोठा फटका

प्लॅटफॉर्म 16-17 च्या पुनर्विकासासाठी 85 दिवसांचा ब्लॉक; 5-6 व्या मार्गिकेचे काम कारणीभूत
Mumbai Local Train Update
Mumbai Local Train UpdatePudhari
Published on
Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील 5 आणि 6 व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.

Mumbai Local Train Update
NCP Merger Debate: अजित पवारांच्या अंत्यदर्शनस्थळी विलीनीकरणाची चर्चा कोणी घडवली? – सुनील तटकरे यांचा शरद पवार गटावर संताप

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, यासाठी मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत 85 दिवसांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 16 व 17 वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून काम पूर्ण होऊन फलाट वाहतुकीसाठी सुपूर्द होईपर्यंत दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून फलाट क्रमांक 16 व 17 वरून गाड्यांची वाहतूक पूर्णतः बंद राहील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले.

Mumbai Local Train Update
Maharashtra Land Records Update: शेतजमिनींच्या नकाशा–७/१२ तफावतीला पूर्णविराम; पोटहिश्शांची मोजणी होणार, ‘भू-आधार’ क्रमांक लागू

सध्या वांद्रे ते बोरिवली दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका उपलब्ध झाली आहे. मात्र सांताक्रूझ दरम्यान जागा नसल्याने या मार्गिकेचे काम रखडले आहे. या प्रकल्पासाठी 964.84 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. जमीन अधिग्रहणाची मोठी अडचण झाली असून महालक्ष्मी लोअर परळ येथील शक्ती मिलच्या 88.573 चौरस मीटर जमिनीचा वाद न्यायालयात असून वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील 155 कुटुंबांचे पुनर्वसन करणेदेखील आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news