

Gokul Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेआज (दि. ९) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळली खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयानुसार उद्या (दि. १०) ठरल्याप्रमाणे गोकुळ अध्यक्ष निवडणूक होईल, निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले चारही सदस्य मतदान करतील, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण निवडणुकीच्या प्रकिया अंतिम निकालाच्या अधीन, असेल असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले ४ ही सदस्य मतदान करतील. सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्रफी केली जाईल. यानंतर निकाल जाहीर केले जाणार, अध्यक्षही निवडला जाईल.
राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले ४ ही सदस्य मतदान करतील. मात्र त्यांची मतदान केलेली मते वेगळे ठेवली जावीत.
राज्य सरकारनके ५०० कोटींच्या वर उलाढाल असणार्या सहकारी संस्थांमधील शासन नियुक्त सदस्यांची संख्या वाढवण्याचा अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश बरोबर की चूक हे अद्याप ठरले नाही. या प्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण निवडणुकीच्या प्रकिया अंतिम निकालाच्या अधीन, असेल असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.