Gokul Sangharsh Moracha Kolhapur: मला पण गोकुळ मध्ये स्वीकृत संचालक घ्या की.... संघर्ष मोर्चातील तज्ज्ञ 'म्हैस' आली चर्चेत

कोल्हापुरी पायतान देखील संघर्ष मोर्चाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Gokul Sangharsh Moracha Kolhapur
Gokul Sangharsh Moracha Kolhapurpudhari
Published on: 
Updated on: 

Gokul Sangharsh Moracha Kolhapur: गोकुळ मध्ये चार स्वीकृत संचालकांना घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येतोय. गोकुळच्या सत्ता संघर्षात लोकांनी आम्हाला मँडेट दिलं आहे असा दावा आमदार आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे. त्यांनी राज्य सरकारने गोकुळमध्ये चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयाचा देखील विरोध केला आहे.

Gokul Sangharsh Moracha Kolhapur
Gokul News | जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आज ‘समविचारी’ची धडक

तज्ज्ञ म्हैशीचीच चर्चा

काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज संघर्ष मोर्चा निघत आहे. दसरा चौकापासून निघणाऱ्या मोर्च्याची जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सांगता होणार आहे. दरम्यान या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी चक्क म्हैस आणण्याचे दिसून येते. तसेच "मला पण गोकुळ मध्ये स्वीकृत संचालक घ्या की" आशयाचा मजकुराचा फलक म्हशीच्या गळ्यात घालून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.'

Gokul Sangharsh Moracha Kolhapur
Satej Patil | कोरम नियमच रद्दचा कायदा का केला नाही?

संघर्ष मोर्चात शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरूद्ध तसेच गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत होत असलेल्या राजकारणावर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या मोर्चाला फक्त जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आलेले नाही तर राज्यातील अनेक भागातून या मोर्चात सहभागी होण्यासाठी शेतकरी दाखल झाले आहेत. त्यांनी देखील राज्य शासनाच्या निर्णयाविरूद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

Gokul Sangharsh Moracha Kolhapur
Gokul Chairman Election | गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी समन्वयाच्या झाल्या घोषणा; चर्चेसाठी मात्र हात मागे

मोर्चात शिवाजी पेठेतून कोल्हापुरी पायतानही

शिवाजी पेठेतून संघर्ष मोर्चात कोल्हापुरी चप्पलाची प्रतिकृती देखील आणण्यात आली आहे. कोल्हापुरी पायतान हे कोल्हापूरची शान आहे. त्याचप्रमाणे ते काही चुकीचं होत असेल तर कोल्हापुरी माणूस ते रोखण्यासाठी पायातलं हेच कोल्हापुरी पायतान हातात घेते हे दर्शवण्यासाठीच ही प्रतिकृती मोर्चाच आणली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.