Gokul Politics: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं.. विराट संघर्ष मोर्चा सुरू असतानाच GR ऑनलाईन टाकून खेळ केला?

शासन नियुक्त संचालकांची नावे भर सभेत सतेज पाटील यांनी वाचून दाखवत गोकुळशी संबंध नसल्याचे सांगितलं
Gokul Politics
Gokul Politicspudhari
Published on: 
Updated on: 

Gokul Chairman Election: गोकुळच्या चेअरमन निवडीचा तिढा निर्माण झाल्यावर समविचारी आघाडीने राज्य सरकारच्या शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विराट संघर्ष मोर्चा आज (दि. ९ नोव्हेंबर) काढण्यात आला. हा मोर्चा सुरू असचानाच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलेल्या मँडेटला हरताळ फासणारा जीआर काढला. सरकारने गोकुळवर चार शासन नियुक्त तज्ज्ञ संचालकांच्या नावांची घोषणा करणारा जीआर काढला.

मोर्चा सुरू असतानाच शासन नियुक्त संचालकांच्या नावांचा 6 तारखेचा जी आर आज ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रविणचंद्र रंगनाथ हेंद्रे, अॅड. प्रशांत भगवान पाटोळे, कृष्णात ज्ञानदेव पाटील यांचा समावेश आहे.

शासनाचा हा जीआर ऑनलाईन जाहीर होताच सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. त्यांनी या चार नावांपैकी एकही नाव गोकुळशी संबंधित नाही किंवा दूध उत्पादनाशी संबंधित नाही अशी टीका केली.

त्यांनी गोकुळशी स्त्रीरोगतज्ज्ञाचा काय संबंध असं म्हणत शासन नियुक्त संचालकांमध्ये डॉक्टरांचा समावेश करण्यावर टीका केली. त्यांनी यातील एक नाव हे सांगली जिल्हातील असून गोकुळ दुसऱ्याच्या घशात घालायची ही सुरूवात असल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.