Global Warming: ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन थर: पृथ्वीच्या संरक्षणकवचावरचं दुहेरी संकट

हरितगृह वायू, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाढत चाललेली तापमानवाढ व ओझोन क्षय — पर्यावरणासमोरील गंभीर आव्हान
Global Warming
Global WarmingPudhari
Published on
Updated on

प... पर्यावरणाचा

नूतन बांदेकर

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मानवी अपर्यावर्णीय घडामोडींमुळे पृथ्वीवरील तापमानात झालेली वाढ, जी जीवसृष्टीला हानिकारक आहे. त्याची कारणे व ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठीचे काही उपाय यावरील चर्चा आपण मागील लेखात केलेली आहे.

जागतिक तापमान वाढ हा आजघडीला चिंतेचा विषय झालेला आहे. त्यात भर म्हणून पृथ्वीचे नैसर्गिक कवच समजला जाणारा ओझोनचा थर विरळ होऊन त्याला पडलेले छिद्र, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने पृथ्वीवर आलेले आणखी एक संकट होय. पृथ्वीच्या या संरक्षण कवचाला विरळ करणाऱ्या सद्याच्या हवेच्या प्रदूषणातील या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे आज सबंध दुनिया चिंतेत पडली आहे. त्यापासून सजीवांचे आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Global Warming
Lonar Lake Maharashtra: विवरप्रसिद्ध लोणार : उल्कापातातून निर्माण झालेलं जागतिक भू-आश्चर्य आणि दैत्यसूदन मंदिराचा ऐतिहासिक वारसा

आज आपण या ग्लोबल वार्मिंग आणि ओझोन वायू यांचा परस्परांशी असलेला संबंध, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओझोनचा शोध 1840 साली क्रिस्टियन फ्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने लावला. ओझोन हा वातावरणाच्या मुख्यतः दोन थरांमध्ये आढळतो, ते म्हणजे जमिनीपासून 10 ते 16 किलोमीटर पर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर आणि तपांबराच्या वर 50 किलोमीटर पर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर. एकूण प्रमाणाच्या 10% ओझोन तपांबरात तर 90% ओझोन स्थितांबरामध्ये आढळतो. स्थितांबरमधला ओझोनचा थर हा ओझोन थर म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते. तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते जंगलांच्या वाढीस मारक तसेच विविध श्वसनविकारांना आमंत्रण देणारे ठरू शकते.

Global Warming
Holi Festival Maharashtra: खेळताना रंग बाई होळीचा; शिमगा, लोकपरंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगोत्सवाची रंगत

ओझोन हा हरितगृह वायू असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो. स्थितांबरातला ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (ज2) विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (ज+ज)वेगळे होतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (ज) ऑक्सिजनच्या रेणूंशी (ज2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (ज3) तयार होतात. ओझोन (ज3) हा तीन ऑक्सिजन अणूंपासून बनलेला फिकट निळ्या रंगाचा एक अत्यंत क्रियाशील वायू आहे, जो सूर्याच्या हानिकारक अतिनील (णत) किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. हा पृथ्वीच्या वातावरणातील स्थितांबरामध्ये) नैसर्गिकरित्या आढळतो आणि पृथ्वीसाठी एका अदृश्य ढाल (र्डीपीलीशशप) प्रमाणे कार्य करतो. ओझोनची रासायनिक रचना पहाता ओझोनचे रेणुसूत्र ज3 आहे, तर आपण श्वास घेतो तो प्राणवायू ज2 आहे.

Global Warming
Hind Di Chadar Panvel: पनवेलमध्ये ‘हिंद दी चादर’ सोहळ्यासाठी भव्य तयारी; 26 लाख पाण्याच्या बाटल्या, 850 आरोग्य कर्मचारी तैनात

मुख्यत्वे जमिनीपासून सुमारे 15 ते 35 किमी उंचीवर ओझोनचा (स्ट्रॅटोस्फियर) हा वरचा थर आढळतो. हा थर सूर्याच्या अतिनील किरणांना शोषून घेऊन ते पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यापासून रोखतो, ज्यामुळे कर्करोग, त्वचेचे आजार आणि डोळ्यांचे नुकसान टळते. म्हणजेच वरचा ओझोनचा थर (ॠेेव जूेपश) पृथ्वीचे संरक्षण करतो. तर जमिनीलगतचा ओझोन (इरव जूेपश) हा नायट्रोजन ऑक्साईड आणि तजउी च्या अभिक्रियेतून तयार होणारा प्रदूषणकारी वायू आहे, जो आरोग्यास हानिकारक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन्स (उऋउी) सारख्या मानवनिर्मित रसायनांमुळे या थराला हानी पोहोचत आहे, ज्यामुळे ओझोनच्या थरात छिद्रे पडत आहेत. थोडक्यात, ओझोन हा जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी वातावरणातील एक आवश्यक घटक आहे.

Global Warming
Ayushman Bharat Scheme: एमएमआरमध्ये आयुष्मान भारतला दार बंद? नामांकित रुग्णालयांचा उपचारांना नकार

ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन यांमधील संबंध - ओझोन थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 15 ते 35 किलोमीटर उंचीवर असलेल्या ओझोनच्या थराचा ऱ्हास आणि ग्लोबल वॉर्मिंग या वेगवेगळ्या समस्या असल्या तरी, दोन्हीचे मूळ कारण मानवी घडामोडी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन हेच आहे. ओझोन थराचे संरक्षण (उदा. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल) हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करते. पृथ्वीवरील मानवी कृतींमुळे निष्पन्न झालेले क्लोरोफ्लोरोकार्बन्स (उऋउी) ओझोन थर नष्ट करतात आणि ग्लोबल वॉर्मिंगलाही कारणीभूत ठरतात. मुख्यत्वे क्लोरोफ्लोरोकार्बन्स (उऋउी), हॅलोन्स आणि इतर ओझोन-क्षयकारी पदार्थांचे (जऊड) उत्सर्जन, जे रेफ्रिजरेशन आणि इतर अनेक उद्योगांमधून होते. ओझोनच्या थराचे मुख्यतः दोन थरात विभागणी होते. त्यापैकी पहिला म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन हा वरचा थर पृथ्वीचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. ओझोनचा हा थर अदृश्य ढाल म्हणून काम करतो

Global Warming
Jal Jeevan Mission: निधीअभावी राज्यातील 25,061 जल जीवन मिशन योजना रखडल्या; 142 कंत्राटदार काळ्या यादीत

आणि सूर्यापासून हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (णत) किरणांपासून आपले संरक्षण करतो. हा थर नष्ट झाल्याने पृथ्वीवर निश्चितपणे तापमानवाढ होऊ शकते. दुसरा थर म्हणजे ट्रोपोस्फेरिक ओझोन, हा कमी पातळीवरील म्हणजे ग्राऊंड लेव्हलवरील एक प्रदूषित आणि हरितगृह वायू आहे, जो ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घालतो. तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणातील बदलांचा अनिष्ट परिणाम ओझोनच्या पुनर्प्राप्तीवर होऊ शकतो, णछएझ / णछ पर्यावरण कार्यक्रम अहवालानुसार, ओझोनच्या पुनर्प्राप्तीमुळे जागतिक तापमानवाढ 0.5 अंश सेल्सिअसने टाळण्यास मदत होऊ शकते. खरंतर ओझोनच्या थरांची पुनर्प्राप्ती ही पृथ्वीच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अशाप्रकारे ओझोन छिद्रामुळे जरी थेट जागतिक तापमानवाढ होत नसली तरी ओझोन थराचा ऱ्हास होणे हे हवामान बदलाच्या चक्राशी जोडलेले आहे, हे निश्चित!

Global Warming
Maternity Leave: कंत्राटी महिला डॉक्टरला प्रसूती रजा द्या; उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला दणका

ग्लोबल वॉर्मिंग व ओझोन छिद्रामुळे सृष्टीची होणारी होरपळ या दोन्ही संकटांना परतवून लावायचे असेल, तर हरितगृह वायूची निर्मिती क्षेत्रे निश्चित करून त्यावर कडक निर्बंध घालणे आवश्यक आहे. आपल्या कृतींमध्ये सकारात्मक बदल घडवून उऋउ म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन निर्मितीला आळा घालणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news