Hind Di Chadar Panvel: पनवेलमध्ये ‘हिंद दी चादर’ सोहळ्यासाठी भव्य तयारी; 26 लाख पाण्याच्या बाटल्या, 850 आरोग्य कर्मचारी तैनात

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त महापालिकेची व्यापक सुविधा; सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतुकीवर विशेष भर
Hind Di Chadar Panvel
Hind Di Chadar PanvelPudhari
Published on
Updated on

पनवेल : पनवेल शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त हिंद दी चादर या विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय आरोग्य विभाग, घनकचरा व आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान व भांडार विभाग अशा विविध विभागाच्यावतीने त्यांच्याशी संबधित सर्व उपायुक्त सेवा सुविधा उत्तम रितीने देण्यावर भर देत आहेत.

Hind Di Chadar Panvel
Ayushman Bharat Scheme: एमएमआरमध्ये आयुष्मान भारतला दार बंद? नामांकित रुग्णालयांचा उपचारांना नकार

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने कार्यक्रमस्थळी सुमारे 26 लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 38 पार्किंगच्या ठिकाणी 110 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. भव्य लंगरच्या ठिकाणी 2 हजार लिटर क्षमतेच्या 30 सिटेंन्स टाक्या बसविण्यात आल्या आहेत. कायग्क्रम स्थळी पिण्याच्या पाण्याकरिता सिडको विभागामार्फत जलवाहिनी टाकून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Hind Di Chadar Panvel
Jal Jeevan Mission: निधीअभावी राज्यातील 25,061 जल जीवन मिशन योजना रखडल्या; 142 कंत्राटदार काळ्या यादीत

हिंद दी चादर या सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महानगरपालिका सुरक्षा विभागामार्फत विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रायगड सुरक्षा रक्षक मंडळ यांचे एकूण 250 सुरक्षा रक्षक ट्रॅफिक वॉर्डन व मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

हे सुरक्षा रक्षक शहरातील प्रमुख मार्ग आणि कार्यक्रम स्थळाच्या परिसरात वाहतुक नियमित करत आहेत. भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी हे पथक विशेष लक्ष देत आहे. भाविकांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महापालिकेकडून दिव्यांग व वृध्द नागरिकांच्या सेवेसाठी 100 व्हिलचेअरर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

Hind Di Chadar Panvel
Maternity Leave: कंत्राटी महिला डॉक्टरला प्रसूती रजा द्या; उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला दणका

घनकचरा व्यवस्थापन

महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागाकडून हिंद दी चादर कार्यक्रम स्थळी संपुर्ण परिसर स्वच्छ राहिल याची काळजी घेतली जात असून एकूण 16 घंटागाड्या ( स्वच्छता रथ) रात्रंदिवस नियुक्त आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या भव्य लंगरच्या ठिकाणी कचरा साठू नये या साठी विशेष 160 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. याठिकाणी सुमारे 120 मोठे डस्टबीन ठेवण्यात आले असून सदर कचऱ्याची वाहतूक त्वरीत विशेष सजवलेल्या स्वच्छता रथाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या व्यतिरीक्त कार्यक्रमाच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी पनवेल महानगरपालिकेकडून 500 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

Hind Di Chadar Panvel
Jayant Patil: मंदिर, मस्जिदऐवजी एआयचा विषय काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे कौतुक

आरोग्य विभाग

आरोग्यसेवेसाठी उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 5 बीएलएस रूग्णवाहिका, 3 एएलएस अद्ययावत रूग्णवाहिका तैनात आहेत. वैद्यकिय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स फार्मासिस्ट, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासहित एकुण 850 पेक्षा अधिक वैद्यकिय आरोग्य कर्मचारी कार्यक्रमस्थळी पुर्णवेळ कार्यरत आहे.

खारघर येथील प्रमुख रस्ते दुभाजक व चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले असून गुरुद्वारा ते सेंट्रल पार्क खारघर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल तसेच जे कुमार सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये सायप्रस व स्पायडर प्लांटची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अधिक हिरवागार व आकर्षक दिसू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news