

Gautam Adani Sharad Pawar Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर) त्यांची भेट घेतली. सकाळी अचानक रुग्णालयात दाखल झालेल्या अदानी यांनी पवार यांच्यासोबत तब्बल अडीच तास चर्चा केली. या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना माझगाव येथील कर्करोग रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असतानाच गौतम अदानी यांनी त्यांची भेट घेतली. शनिवारी सकाळी अदानी अचानक ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पवार यांची भेट घेतली. ही भेट तब्बल अडीच तास चालल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, सध्या राज्यात मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनचा मुद्दा चर्चेत आहे. अशा राजकीय वातावरणात देशातील प्रमुख उद्योगपती गौतम अदानी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची झालेली भेट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अदानी आले होते की या भेटीमागे अन्य काही राजकीय चर्चा होती, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.