Festive Season Jobs 2026: गुड न्यूज! सणासुदीच्या काळात नोकऱ्यांचा पाऊस; हंगामी भरतीमध्ये १५ ते २० टक्के वाढीचा अंदाज

यंदा सणासुदीच्या काळात रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता असून, तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
Festive Season Jobs
Festive Season JobsFile Photo
Published on
Updated on

Festive Season Jobs 2026

मुंबई : यंदा सणासुदीच्या काळात रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता असून, तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांकडून वेअरहाउसिंग, स्टोअर, डिलिव्हरी आणि ऑर्डर यांसारख्या क्षेत्रांत विशेष कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती वाढवत आहेत.

टीमलीज सर्व्हिसेसच्या 'फेस्टिव्ह सीझन वर्कफोर्स रिपोर्ट-२०२६' नुसार, संघटित किरकोळ विक्री, ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी आणि ग्राहक उपयोगी टिकाऊ वस्तू यांसारख्या विविध क्षेत्रांतील कंपन्या गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणासुदीच्या काळात अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची शक्यता आहे.

अहवालात नमूद केले आहे की, केवळ मोठ्या संख्येने कर्मचारी भरती करण्याऐवजी, कंपन्या आता वेअरहाउसिंग, स्टोअर व्यवस्थापन आणि ऑर्डर पोहचवणे या संबंधित विशेष कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीवर अधिक भर देत आहेत.

Festive Season Jobs
Delhi Pune SpiceJet flight: दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानात भयंकर प्रकार! अचानक तापमान वाढले, प्रवाशांचा श्वास कोंडला VIDEO

दीर्घकाळ चालणारा सणासुदीचा हंगाम, जलद ऑर्डर डिलिव्हरीबाबतच्या वाढत्या अपेक्षा आणि विविध माध्यमांतून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाढती संख्या यांमुळे हा बदल घडत आहे. या अहवालासाठी सणासुदीच्या काळात कार्यरत असलेल्या सुमारे ६० हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या रोजगार नोंदी तसेच टीमलीजच्या अंतर्गत मनुष्यबळाशी संबंधित आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनापासून दिवाळी आणि वर्षअखेरीच्या सुट्ट्यांपर्यंत विक्रीचा कालावधी लांबणार असल्याने कंपन्या संपूर्ण फेस्टिव्ह सीझनमध्ये सातत्याने कामकाज सांभाळू शकणारे मनुष्यबळ तयार करत आहेत. त्यामुळे हंगामी तसेच तात्पुरत्या रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, २०२६ च्या उत्तरार्धात अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात ८ ते १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. मात्र, कामगार कायद्यांमधील बदलांमुळे, कर्मचाऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष येणाऱ्या वेतनात ५ ते ८ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

Festive Season Jobs
Polymer note : १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १०० कोटी पॉलिमर नोटा चलनात येणार!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news