FASTag Scam : 'मुन्नाभाई' फेम अभिनेत्याने केला 'फास्टॅग घोटाळ्या'चा आरोप; व्हिडिओ शेअर करत दिला चालकांना इशारा

अतिरिक्त दंड भरावा लागल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर
FASTag Scam : 'मुन्नाभाई' फेम अभिनेत्याने  केला 'फास्टॅग घोटाळ्या'चा आरोप; व्हिडिओ शेअर करत दिला चालकांना इशारा
Published on
Updated on

FASTag Scam

मुंबई : टोल भरताना चालकांची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते, यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अश्विन मुशरान याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फास्टॅग खात्यात पुरेशी रक्कम असतानाही त्याला टोलनाक्यावर अतिरिक्त दंड भरावा लागल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल होत असून, अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांनाही असाच अनुभव आल्याचे म्हटले आहे.

नक्की काय घडलं?

अश्विन मुशरानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हा प्रकार मुंबईतील 'बांद्रा-वरळी सी-लिंक' (Bandra-Worli Sea Link) वरून प्रवास करताना घडला. टोल बूथवरील कर्मचाऱ्याने अश्विनला सांगितले की, त्याच्या वाहनाला लिंक असलेल्या फास्टॅग खात्यामध्ये पुरेशी रक्कम नाही. खात्यात पैसे नसल्याचे कारण सांगून अश्विनकडून तब्बल २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

FASTag Scam : 'मुन्नाभाई' फेम अभिनेत्याने  केला 'फास्टॅग घोटाळ्या'चा आरोप; व्हिडिओ शेअर करत दिला चालकांना इशारा
AI FASTag Toll: फास्टॅग + AIची कमला! टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही; न थांबता टोल कापला जाणार, काय आहे सरकारचा प्लॅन?

मोठ्या फास्टॅग घोटाळ्याचा आरोप

अश्विनने नंतर आपले फास्टॅग खाते तपासले, तेव्हा त्याच्या खात्यात तब्बल ३,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक असल्याचे त्याला दिसले. खात्यात एवढे पैसे असतानाही आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने दंड का वसूल करण्यात आला? असा सवाल करत अश्विनने यामागे मोठा फास्टॅग घोटाळा असण्याची शक्‍यताही त्‍याने व्‍यक्‍त केली आहे.

FASTag Scam : 'मुन्नाभाई' फेम अभिनेत्याने  केला 'फास्टॅग घोटाळ्या'चा आरोप; व्हिडिओ शेअर करत दिला चालकांना इशारा
FASTag blacklist rule |एक चूक आणि FASTag होईल 'ब्लॅकलिस्ट' ! NHAIने बँकांना कोणते आदेश दिले?

अभिनेत्याने इंस्टाग्रामवर शेअर केला अनुभव

अश्विन मुशरानने हा प्रकार केवळ सोडून न देता, परतीच्या प्रवासात याची पडताळणी करण्याचे ठरवले. विशेष म्हणजे, जेव्हा तो त्याच वाहनाने सी-लिंकवरून परत आला, तेव्हा कोणतीही समस्या न येता फास्टॅग ऑटोमॅटिक स्कॅन झाला आणि टोल कापला गेला. यानंतर अश्विनने टोल बूथवरील वरिष्ठ पर्यवेक्षकांकडे जाऊन आपल्या खात्यातील बॅलन्सचा पुरावा दाखवला आणि जाब विचारला. अखेर टोल प्रशासनाला आपली चूक मान्य करावी लागली आणि अश्विनला त्याचे २०० रुपये परत (Refund) करण्यात आले.

FASTag Scam : 'मुन्नाभाई' फेम अभिनेत्याने  केला 'फास्टॅग घोटाळ्या'चा आरोप; व्हिडिओ शेअर करत दिला चालकांना इशारा
Free Fastag Balance: आता 1,000 रुपयांचा FASTag फ्री मिळणार; फक्त हे काम करावं लागणार, सरकारची भन्नाट स्कीम

फास्टॅग घोटाळ्यापासून कसं वाचाल?

या घटनेनंतर वाहनचालकांनी अशा संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे याबाबतही अश्विन मुशरानने टिप्स शेअर केल्या आहेत.

  • प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या फास्टॅग खात्यात किती पैसे आहेत हे नेहमी तपासा आणि त्याचा एक स्क्रीनशॉट पुरावा म्हणून जवळ ठेवा.

  • टोल कर्मचारी खात्यात पैसे नसल्याचे सांगत असेल, तर लगेच पैसे न देता तिथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे फिजिकल व्हेरिफिकेशनची (Physical Verification) मागणी करा.

  • अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तुम्ही स्वतः खात्याची स्थिती तपासत नाही, तोपर्यंत घाईगडबडीत कोणताही अतिरिक्त दंड किंवा रोख रक्कम भरू नका.

  • अशा प्रकारच्या समस्या आल्यास तक्रार नोंदवण्यासाठी चालकांनी '70395 86803' या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अभिनेत्याने केले आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

कथित फास्टॅग घोटाळ्याच्या व्हिडिओवर नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटले आहे की, "२०० रुपये ही दिसायला जरी लहान रक्कम वाटत असली, तरी हजारो वाहनांकडून दररोज अशी वसुली केली गेल्यास हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाऊ शकतो." हा केवळ एक तांत्रिक बिघाड होता की मुद्दाम केलेला गैरप्रकार, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, भारतीय महामार्गांवरून प्रवास करताना चालकांनी आपल्या फास्टॅग व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news