Fake Sports Certificate: बनावट क्रीडा प्रमाणपत्रांवर मोठी कारवाई; 121 जणांची सरकारी सेवेतून हकालपट्टी

खोट्या प्रमाणपत्रांवर मिळविलेल्या नोकऱ्या रद्द; पडताळणीत गैरप्रकार उघड
Sunetra Pawar NCP president
Sunetra Pawar NCP Pudhari
Published on
Updated on

मुंबई : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून सरकारी सेवेत भरती झालेले 316 अधिकारी निलंबित केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी लाटणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेत नोकरी मिळविलेल्या अशा 121 उमेदवारांवर कारवाई करून त्यांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

Sunetra Pawar NCP president
NCERT Maratha Empire Map: ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला

राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे अनेक उमेदवारांनी सरकारी नोकरी मिळविल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माहिती दिली आहे. शासनाने विविध शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांत गुणवत्ताधारक खेळाडूंना 5 टक्के आरक्षण देण्याबाबत धोरण आणले आहे. मात्र, या धोरणांतर्गत बनावट प्रमाणपत्राच्या आधारे अनेक उमेदवारांनी शासकीय नोकरी मिळविल्याचे निदर्शनास आले होते. तसेच अनेक क्रीडा संघटनांकडून बनावट क्रीडा

Sunetra Pawar NCP president
Ashish Shelar : पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी पुढील अधिवेशनापूर्वी महामंडळे

प्रमाणपत्रे दिली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी 30 जून 2022 च्या शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धतीत बदल करत क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक कडक केली आहे. या तपासणीत 121 खेळाडू बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सेवेत समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित विभागाने कारवाई करून त्यांना नोकरीतून कमी केले असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उत्तरात म्हटले आहे.

Sunetra Pawar NCP president
Minister Ashish Shelar | पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी पुढील अधिवेशनापूर्वी महामंडळे

गैरप्रकार रोखण्यासाठी ‌‘क्रीडा-ई-प्रमाण‌’ प्रणाली

बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी शासनाने 23 फेब्रुवारी 2022 रोजीच्या शासना निर्णयानुसार बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना राबविण्यास मंजुरी दिली होती. या योजनेंतर्गत 170 उमेदवारांनी आपली बोगस क्रीडा प्रमाणपत्रे समर्पित केली, असेही उत्तरात म्हटले आहे. तसेच भविष्यात विलंब व गैरप्रकार टाळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन ‌‘क्रीडा-ई-प्रमाण‌’ प्रणाली सुरू करण्यात आली असून या प्रणालीद्वारे क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news