E Rickshaw Permit: ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परमिट बंधनकारक; परिवहन विभागाचा नवा निर्णय

प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी व परवाना अनिवार्य; सर्व वाहनांसाठी समान नियम लागू करण्याचा सरकारचा निर्णय
E Rickshaw Permit
E Rickshaw PermitPudhari
Published on
Updated on

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

E Rickshaw Permit
Purandar IT Project: हिंजवडीवरील ताण कमी होणार, पुरंदरमध्ये आयटी पार्क; उद्योग मंत्री उदय सामंतांची घोषणा

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना (ई-रिक्षा) प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा विचार करता केंद्र शासनाच्ा अधिसूचनेनुसार प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी ई-रिक्षा व ई-बाईक साठीही परमिट (परवाना) प्रक्रिया

E Rickshaw Permit
Metro Station Rickshaw: मेट्रो स्थानकांबाहेर आता रिक्षासेवा; प्रवाशांच्या प्रवासाला नवी सोय

बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे आणि अनियमितता टाळणे हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.

E Rickshaw Permit
High Court Tax Refund: करदात्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जुना टॅक्स रिफंड नव्या मागणीविरुद्ध वळता करता येणार नाही

परवान्यासाठी एक खिडकी योजनेची तयारी

परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून एक खिडकी योजना सुरू करण्याची तयारी आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पार पाडली जाणार आहे. तथापि, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी परमिट घेणे अनिवार्य राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news