DHFL Financial Scam : डीएचएफएल घोटाळा; लाचप्रकरणी तिघांना अटक

एसएफआयओचा उपसंचालक हरीश कुमार तन्वर, वकील भरत शर्मा व आर्यन शर्मा यांचा समावेश
DHFL Financial Scam
DHFL Financial Scampudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबईशी संबंधित दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) आर्थिक घोटाळ्याच्या तपासात मदत करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गंभीर फसवणूक तपास कार्यालयातील (एसएफआयओ) उपसंचालकासह तिघांना अटक केली आहे. हरीश कुमार तन्वर, वकील भरत शर्मा व आर्यन शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आर्यन हा भरत शर्मा यांचा नातेवाईक आहे.

या प्रकरणी सीबीआयने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवून सापळा रचला. या कारवाईदरम्यान भरत शर्मा याने एसएफआयओ अधिकारी तन्वर यांच्या वतीने तक्रारदाराकडून २० लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. ही रक्कम कथित एक कोटी रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सीबीआयने तिघांना अटक केली.

DHFL Financial Scam
Golfa Devi Navratri Festival : भक्तांच्या हाकेला धावून येणारी गोलफा देवी

चेन्नईतील अधिकाऱ्याचा समावेश

अटक केलेले हरीश कुमार तन्वर हे २०१७ च्या तुकडीतील आयआरएस अधिकारी आहेत. ते सध्या चेन्नई येथे एसएफआयओच्या उपसंचालकपदी कार्यरत आहेत. भरत शर्मा हेवकील असून, आर्यन शर्मा हा त्यांचा नातेवाईक आहे. या तिघांमधील कथित आर्थिक व्यवहार आणि तपासात मदत करण्याच्या आश्वासनामागील नेमकी भूमिका सीबीआय तपासत आहे.

घोटाळ्याची पार्श्वभूमी

डीएचएफएलमधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि येस बँकेशी संबंधित संशयास्पद व्यवहारांची यापूर्वी सीबीआय तसेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली आहे. डीएचएफएलचे मुख्यालय मुंबईत असल्याने या आर्थिक घोटाळ्याची पार्श्वभूमी महाराष्ट्राशी संबंधित आहे.

DHFL Financial Scam
Rahuri District Bank Election: आता थांबणार नाही! राहुरीतून सत्यजित कदम ठाम; तनपुरेंची कोंडी

झडतीत आक्षेपार्ह साहित्य

या प्रकरणात तिघांच्या अटकेनंतर सीबीआयने संबंधित ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईत सदर प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचे सांगण्यात आले. कथित लाचेच्या बदल्यात तपासात कोणती मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास संबंधितांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news