Rahuri District Bank Election: आता थांबणार नाही! राहुरीतून सत्यजित कदम ठाम; तनपुरेंची कोंडी

राहुरी सोसायटी मतदारसंघात १०७ मतदार; सत्यजित कदम यांनी माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने निवडणुकीबाबत उत्सुकता
Rahuri District Bank Election
Rahuri District Bank ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा बँकेच्या राहुरी सोसायटी मतदारसंघातून भाजपाचे आमदार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून येण्याची चर्चा सुरू असतानाच, भाजपाचेच माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र तथा देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र मतदारयादीचा गृहपाठ पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यातच कदम यांनीही ‘आता माघार नाही’ असा पवित्रा घेतल्याने राहुरीत पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

राहुरी सोसायटी मतदारसंघात 107 मतदार आहेत. येथून बँकेचे माजी संचालक अरुण तनपुरे यांचे पुत्र हर्ष तनपुरे, तसेच आमदार प्राजक्त तनपुरे आणि देवळालीचे सत्यजित कदम या तिघांचेच उमेदवारी अर्ज आहेत. यातील हर्ष तनपुरे यांना उपनगराध्यक्ष पद दिल्याने प्राजक्त तनपुरेंचा बँकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सत्यजित कदम यांच्या माघारीचा निर्णय बाकी आहे.

Rahuri District Bank Election
Pune Police Recruitment Scam: पुणे पोलिस भरतीत मोठा गैरप्रकार! कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे १९ जणांची नोकरी जाणार

विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी सत्यजित कदम यांना थांबविण्यात आले होते. पुढे, कर्डिलेंच्या निधनानंतर पोटनिवडणुकीतही अक्षय कर्डिलेंसाठी पक्षश्रेष्ठींनी कदम यांना थांबवले होते. त्यानंतर, विधानपरिषद निवडणुकीतही सत्यजित कदम यांनी मुंबईपर्यंत फिल्डिंग लावली होती.

मात्र, प्राजक्त तनपुरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली आणि पुन्हा कदम यांना ‘थोडं थांबावंच लागेल’ असे सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक वेळी ‘दावा करायचा आणि शेवटी माघार घ्यायची’ अशीच काहीशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी झाल्याचे बोलले गेले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कदम यांनी राहुरी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. गेल्या वेळी तनपुरेंसाठी आपण थांबलो, आता तनपुरेंनी आमच्यासाठी थांबावे, भाजपानेही तीन वेळा थांबवल्याची आठवण ठेवून कदम यांना बँकेत संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

दरम्यान, देवळाली परिसरातील 32 गावांमध्ये कदम यांची ताकद आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचा अजूनही गावोगावी संपर्क आहे. मूळ भाजपाचा एक गटदेखील कदम यांनी उमेदवारी करावी, यासाठी आग्रही असल्याचे समजते.

Rahuri District Bank Election
Pune Kharadi Engineer Case: पुण्यात सायबर फसवणुकीच्या धमकीनंतर तरुण अभियंत्याचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

आ. प्राजक्त तनपुरेंची सहकारातही ताकद मोठी आहे. सर्वाधिक ठरावही त्यांच्याकडे असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतरही ‘कदम लढणारच, की चौथ्यांदा मैदानातून माघार घेणार,’ याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. मागील काही निवडणुकांत वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून मी प्रामाणिकपणे थांबलो. आता जिल्हा बँकेत मला संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. परंतु, आताही मला पुन्हा थांबण्याचाच सल्ला दिला जाणार असेल, तर मात्र मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. माझ्याकडेही मतांची बेरीज आहे.

-सत्यजित कदम, देवळाली प्रवरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news