Land Acquisition: दहिसर - भाईंदर लिंक रोडच्या भूसंपादनाला मंजुरी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाचे पाऊल

Land Acquisition
Land Acquisitionpudhari
Published on
Updated on

Land Acquisition: मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित 'दहिसर-भाईंदर लिंक रोड' प्रकल्पाच्या दिशेने महापालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रस्त्याच्या जंक्शनसाठी आवश्यक असणाऱ्या एकसर येथील ३,१३१ चौरस मीटर जमिनीच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सुधार समितीत अखेर मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर ४.१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Land Acquisition
Maharashtra Land Acquisition: सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांमधील तंटे मिटणार; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

प्रस्तावित ४५ मीटर रुंद असणाऱ्या या लिंक रोडची मुंबई महापालिका हद्दीतील लांबी सुमारे १.५ किमी, तर मीरा-भाईंदर हद्दीतील लांबी ३.१ किमी आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून मुंबईसह लगतच्या उपनगरांतील दळणवळण अधिक गतिमान होईल, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री वॉर रूमने या रस्त्याला तसेच कोस्टल रोड नॉर्थला ‘महत्त्वाचा नागरी वाहतूक प्रकल्प’ म्हणून आधीच मान्यता दिलेली आहे.

Land Acquisition
Land Acquisition: भूसंपादन मोबदल्यावर ‘विलंब व्याजदर’ मिळणार एक टक्का अधिक; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

विरोधकांचा विरोध आणि महापालिकेत गदारोळ

दरम्यान, सुधार समितीत या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या भूसंपादनामुळे जमिनीवरील ८ व्यावसायिक बांधकामे बाधित होणार आहेत. त्यामुळे बाधितांचे योग्य पुनर्वसन आधी करावे आणि प्रस्तावातील तांत्रिक त्रुटी दूर होईपर्यंत भूसंपादनाचा प्रस्ताव थांबवावा, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी केली. तसेच, या प्रकल्पाचा एक मोठा भाग मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्या हिश्श्याचा खर्च त्यांनीच करावा, अशीही मागणी करण्यात आली.

Land Acquisition
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनास पुन्हा मुदतवाढ; ९२.५ टक्के शेतकऱ्यांची संमती

विरोधकांचे सर्व आक्षेप फेटाळत आणि प्रकल्पाचे सार्वजनिक महत्त्व लक्षात घेत सत्ताधाऱ्यांच्या आग्रहाने अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बाधितांच्या पुनर्वसनाचा खर्च स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news