पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगालच्या उपसागातील 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करत आहे. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीचे जिल्हे प्रभावित होणार आहेत. परंतु महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस. होसाळीकर यांनी X पोस्टवरून दिली आहे.
चक्रीवादळ 'रेमल' पुढील काही तासांत आणखी रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. दरम्यान आज (दि.२६) मध्यरात्री 'रेमल' चक्रीवादळ (Cyclone Remal Latets Updates) पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान. बंगालसह अनेक राज्यांना याचा फटका बसेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे शनिवारी (दि.२५) रात्री ' रेमल' चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. आज (दि.२६) हे चक्रीवादळ आणखी तीव्र झाले आहे. दरम्यान आज (दि.२६) मध्यरात्री 'रेमल' चक्रीवादळ पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किमी असणार आहे तर तो १३५ किमी वाढू शकतो. परंतु, या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
'रेमल' चक्रीवादळाच्या प्रभावादरम्यान बुधवार दि.२९ मे पर्यंत वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्वेकडील राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
IMD बुलेटिन नुसार, चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीचे जिल्हे प्रभावित होतील. रविवार २६ मे आणि सोमवार २७ मे रोजी 'या' राज्यातील भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, बहुतेक भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्याही भागात काहीच परिणाम होणार नाही; असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा: