Gas Scam: गॅस कनेक्शनच्या आड महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक; वांद्रे येथील घटना

अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल
Gas Scam
Gas ScamPudhari
Published on
Updated on

मुंबई: नागरिकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याला लक्ष्य केले. गॅस कनेक्शनच्या बहाण्याने त्यांची शनिवारी 45 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञातावर सोमवारी गुन्हा नोंदविला आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारीपदी कर्तव्याला असलेल्या महिला अधिकारी वांद्रे पोलीस वसाहतीत राहतात. तीन दिवसांपूर्वी घरी असताना त्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला.

Gas Scam
Development Works: नवी मुंबईतील विकासकामांना गती; 46 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी

फोनवर बोलणाऱ्याने त्यांना महानगर गॅस कनेक्शन मंजूर झाल्याचे सांगून एक पीडीएफ फाईल पाठविली.त्या माहिती भरण्यास त्यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी फाईल डाउनलोड करून त्यात वैयक्तिक माहिती भरली.

माहिती अपलोड करताच त्यांच्या खात्यातून दोन ट्रायझेक्शनद्वार 45 हजार रुपये ट्रान्सफर झाले. याबाबत मेसेज प्राप्त होताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिला पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भामट्यावर गुन्हा दाखल केला.

Gas Scam
Govandi eviction notice: नाला रूंदीकरणातील बाधितांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा; गोवंडीत रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ऑनलाईन व्यवहार; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा. खात्री पटल्याशिवाय कुठल्याप्रकारे वैयक्तिक माहिती कोणाला शेअर करू नका. मेसेजद्वारे कुठल्याही प्रकारची फाईल आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करू नका. अन्यथा ऑनलाइन लुटीला बळी पडाल. आपली सुरक्षा आपल्या हाती, हे लक्षात ठेवूनच ऑनलाइन व्यवहार करावा, असे आवाहन या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news