Development Works: नवी मुंबईतील विकासकामांना गती; 46 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी

या निर्णयांमुळे शहरातील मूलभूत सेवांच्या सुधारणा प्रक्रियेला गती मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
Navi Mumbai Municipal Coropration
Navi Mumbai Municipal CoroprationPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पायाभूत सुविधा, शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुमारे 46 कोटी 5 लाख 1 हजार 656 रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली. या निर्णयांमुळे शहरातील मूलभूत सेवांच्या सुधारणा प्रक्रियेला गती मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

या बैठकीत शिक्षण विभागाशी संबंधित कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाशी जोडण्यासाठी 15 माध्यमिक शाळांमध्ये ‌‘टिंकरिंग लॅबोरेटरीज‌’ उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Navi Mumbai Municipal Coropration
Govandi eviction notice: नाला रूंदीकरणातील बाधितांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा; गोवंडीत रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण, नवकल्पना व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय महापालिका शाळांतील50,558 विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठ्यासाठी 13 कोटी 33 लाखांच्या निधीला मान्यता देण्यात आली. शाळा सुरू होताच गणवेश वितरण सुरळीत व्हावे यासाठी संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुर्भे येथे नवीन आरसीसी नाल्याचे बांधकाम व बेलापूर विभागात संरक्षक भिंती उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. पावसाळ्यातील पाणी निचरा व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची मानली जात आहेत.

Navi Mumbai Municipal Coropration
Kalyan Crime News: कल्याणमध्ये पूजापाठाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 78 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या

पर्यावरणपूरक उपक्रमांच्या अनुषंगाने स्मशानभूमींचे आधुनिकीकरण करून ‌‘हायब्रीड‌’ पद्धतीची स्मशानभूमी विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी 4 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून पारंपरिक पद्धतींसोबत पर्यावरणस्नेही उपाययोजनांचा समावेश करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news