NCP internal conflict : विलीनीकरणावरून राष्ट्रवादीत वादंग

12 तारखेला विलीनीकरणाची घोषणा होणार होती : शरद पवार
NCP internal conflict
शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीचा व्हिडीओ शनिवारीच व्हायरल झाला... pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत विलीनीकरणावरून वादविवाद सुरू झाले आहेत. यासंदर्भात विलीनीकरणावर प्रथमच शरद पवार यांनी भाष्य करत येत्या 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची घोषणा होणार होती, असा गौप्यस्फोट केला.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणावर स्पष्टपणे भाष्य केले. गेल्या चार महिन्यांपासून या विषयावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 12 तारखेला याबाबत घोषणा होणार होती. मात्र घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे पवार म्हणाले.

यापूर्वी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. त्याबाबत अजित पवारांच्या सोबत आमच्या बैठका झाल्या होत्या. शरद पवार यांच्या समोरच दोन्ही पक्ष एकत्र व्हावे ही त्यांची इच्छा होती, असे सांगत शरद पवार गट विलीनीकरणास तयार असल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर अजित पवारांच्या सोबत चर्चा झाल्याचे सांगत दोन पक्ष एकत्र यावते ही त्यांची मनोमन इच्छा होती,असे सांगितले.

NCP internal conflict
Mumbai News : विलीनीकरण आता अजित पवार यांच्या स्वप्नानुसार!

त्याचवेळी शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीचा व्हिडीओ शनिवारीच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार हे दिसत आहेत. म्हणजेच अजित पवार वगळता त्यांच्या पक्षाचा दुसरा नेता या बैठकीत नव्हता.

एकत्र येण्याची घोषणा जिल्हा परिषद निवडणुकीपुरती : सुनिल तटकरे

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केल्यानंतर ही चर्चा फक्त जिल्हा परिषदेपुरतीच होती, दोन्ही पक्ष कायमचे एकत्र येण्याबाबत नव्हती, असे सांगत विलीनीकरणाला अजित पवार गट उत्सुक नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. तरीही अजित पवार गटातील काही नेते उघडपणे विलीनीकरणाच्या बाजूने भूमिका मांडत आहेत.

या बैठकीबाबत बोलताना खा. तटकरे म्हणाले की, संबंधित व्हिडीओमध्ये जी बैठक दाखवली जात आहे, ती बारामतीला कृषी प्रदर्शनावेळी चहापानासाठी झाली होती. बैठकीनंतर स्वतः अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात चर्चा झाल्याची माहिती दिली होती. ती जिल्हा परिषदेत एकत्र लढण्याबाबत बैठक होती. ती विलीनीकरणाबाबत बैठक झाली नव्हती, असे सांगितले.

त्याचवेळी छगन भुजबळ यांनीही आता विलीनीकरणावर जो काही निर्णय घ्यायचा तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच घेतील, त्यांना पक्षाचे सर्व अधिकार आहेत, असे सांगत हात झटकले. अजित पवार यांच्या पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांनीही संबंधित बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत होती की विलीनीकरणाबाबत होती हे सर्व प्रश्न आता अनुत्तरित आहेत. याबाबत उत्तर देणारे आमचे नेते वर गेले आहेत, असे सांगत विलीनीकरणास अजित पवार गट उत्सुक नसल्याचेच संकेत दिले.

NCP internal conflict
Mumbai Mayor election : महापौरपदासाठी भाजपच्या सहा जणी उत्सुक

अजित पवार गटाचे काही नेते विलीनीकरणाच्या बाजूने

पक्षाचे काही नेते विलीनीकरणाच्या विरोधात भूमिका मांडत असतानाच विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार अमोल मिटकरी यांनीही विलीनीकरणाला पूरक भूमिका मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news