Mumbai News : विलीनीकरण आता अजित पवार यांच्या स्वप्नानुसार!

समांतर गटाला जास्त पदे मिळू नयेत यासाठी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली जबाबदारी?
NCP merger talks
विलीनीकरण आता अजित पवार यांच्या स्वप्नानुसार!Pudhari
Published on
Updated on

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये सुरू असलेली विलीनीकरणाची चर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आग््राहानुसार घडू नये. कारण तसे घडले तर गेली काही वर्षे अजित पवार यांनी अत्यंत मेहनतीने वाढवलेला पक्ष त्यांच्या स्वप्नानुसार न चालता शरद पवार यांच्या आदेशानुसार चालवावा लागेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना आपण सूत्रे घ्या अशी गळ घातल्याचे समजते.

विलिनिकरणाबाबत स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही सकारात्मक होते असा दावा अजित पवार गटाकडून केला जातो आहे. अजित पवार यांच्या निधना नंतर त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या नरहरी झिरवळ यांच्यासारख्या मंत्र्यानेही शरद पवार यांनी नेतृत्व करावे असे जाहीर विधान केले. त्यानंतर विलीनकरणास त्यांची मान्यता असेल तर पक्ष पुन्हा एकदा त्यांच्या मतानुसार चालेल हे अजित पवार यांच्यासमवेत असलेल्या काही नेत्यांना वाटले. पक्षातील महत्वाची पदे त्या परिस्थितीत शरद पवार गटाकडे सोपवली जातील ही शक्यता लक्षात घेत काही वरिष्ठ नेते सक्रिय झाले. त्यातूनच त्यांनी सुनेत्रा पवार यांना साकडे घालत भाजपला या घडामोडीची माहिती दिल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

NCP merger talks
Disability benefits misuse : दिव्यांगाचे शासकीय लाभ घेतल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

अजित पवार यांनी हा पक्ष वाढवण्यासाठी घेतलेल्या श्रमांचा हवाला देत साकडे घातले गेल्याने सुनेत्रा पवार यांनी ही परिस्थिती लक्षात घेता होकार दिला असे समजते. शरद पवार यांचे निकटतम मित्र विठ्ठलसेठ मणियार यांनी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे रहाण्याचा शब्द दिल्याने या घडामोडी सोप्या झाल्या असेही सांगितले जाते आहे.

दोन्ही पक्षातील सूर लक्षात घेता प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी दोन दिवसात शपथविधीचा निर्णय प्रत्यक्षात आणला. आता विलिनीकरण झाले तरी ते अजित पवार गटाला मध्यबिंदू ठेवत होईल असे एका राजकीय निरीक्षकाने सांगितले.दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतल्यास विलिनीकरण होऊ शकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा व्यक्त केला.

NCP merger talks
Mumbai BDD Chawl : वरळीच्या तीस बीडीडी चाळींसाठी आता 2 फेब्रुवारीला सोडत

सुनेत्रा पवार करणार लवकरच आवाहन?

दरम्यान सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्या विलिनीकरणाबद्दल शरद पवार यांच्या गटासमोर रीतसर प्रस्ताव ठेवतील असेही सांगितले जाते आहे. शपथविधी, त्याबाबतचे कुटुंबातील वातावरण लक्षात घेता आता शरद पवार काय प्रतिसाद देतील,मुळात प्रारंभपासूनच सुप्रिया सुळे यांना विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य होता काय याबाबत त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. याबाबत सुनेत्रा पवार लवकरच आवाहन करतील असे समजते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news