Mumbai Mayor election : महापौरपदासाठी भाजपच्या सहा जणी उत्सुक

महापौरपदी आपल्या समर्थक नगरसेविकेची वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या काही नेत्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे फिल्डिंग
Mumbai Mayor election
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार हे अद्यापपर्यंत निश्चित न झाल्यामुळे भाजपामधील अर्धा डझनपेक्षा जास्त नगरसेविका महापौरपदासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे महापौरपदी आपल्या समर्थक नगरसेविकेची वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे फिल्डिंग लावल्याचे समजते.

मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद हे महिला खुल्या वर्गामध्ये आरक्षित झाल्यामुळे भाजपातील अनेक ज्येष्ठ महिला नगरसेवकांनी महापौरपदी वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते. सुरुवातीला रितू तावडे व शीतल गंभीर यांची नावे आघाडीवर होती. मात्र आता या स्पर्धेत राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, रिटा मकवाना, हर्षिता नार्वेकर यांची नावे महापौरपदासाठी पुढे येत आहेत.

Mumbai Mayor election
Mumbai BDD Chawl : वरळीच्या तीस बीडीडी चाळींसाठी आता 2 फेब्रुवारीला सोडत

आपल्या कट्टर समर्थक नगरसेविकेला महापौर पदी बसवण्यासाठी त्यांच्या विभागातील आमदार व वरिष्ठ नेत्यांनी जोरदार फील्डिंग लावली आहे. यासाठी अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

महापौरपदी कोणाला बसवायचे हे सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत. यासाठी नगरसेविकांचे मागील काही वर्षाचे प्रगती पुस्तक तपासण्यात येत आहे. विशेष करून महापालिका विसर्जित झाल्यानंतर नगरसेविकांनी आपल्या प्रभागांमध्ये काय काय कामे केली, याचाही लेखाजोखा घेण्यात येणार आहे.

स्थापन होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून जबाबदारी पार पाडू शकतात का, याबाबतही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. चर्चेत असलेल्या महिला नगरसेविकांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या नगरसेविकेची वर्णी लागेल, हे सांगता येत नाही.

Mumbai Mayor election
Sunetra Ajit Pawar : धाराशिवची लेक राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री

महापौरपदासाठी पुढील आठवड्यात महिला नगरसेविकेचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठी आलेली संधी गमवायची नाही यासाठी इच्छुक नगरसेविका आपापल्या परीने प्रयत्नशील असल्याचे समजते. पण कोणीही जाहीरपणे बोलण्यास तयार होत नसून पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असल्याचे सांगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news