Vijay Singhal : मुंबई - नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी 24 हजार कोटींची मेट्रो

सिडको काढणार येत्या 3 ते 4 महिन्यांत प्रकल्पासाठीची निविदा
Mumbai Navi Mumbai airport metro project
विजय सिंघलpudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडण्यासाठी तब्बल 24,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सिडकोने हाती घेतला असून 3 ते 4 महिन्यांत या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

सध्या नवी मुंबईत बेलापूर ते पेंधर ही लाईन 1 कार्यरत आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि आतापर्यंत 1 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांनी त्याचा प्रवास केला आहे. आता या नव्या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 32 किमी असून, त्यापैकी 9 किमी मार्ग हा अंडरग्राऊंड (भूमिगत) असेल.

Mumbai Navi Mumbai airport metro project
Mumbai metro expansion | मेट्रोमय महामुंबई

ही मेट्रो नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या सर्व विभागांना मेट्रोच्या जाळ्याने जोडणारी ठरेेल. मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि विस्तार हा विमानतळाच्या पूर्वेला पनवेल शहर, उरण आणि तिसरी मुंबई यांना जोडणारी मेट्रो लाईन उभारली जाईल.

Mumbai Navi Mumbai airport metro project
Thane circular metro project : ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रोमुळे वाहतूककोंडी फुटणार!

नवीन 32 किमी लाईनसाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, हे काम पीपीपी तत्त्वावर केले जाणार आहे. सध्या पीअर रिव्ह्यूचे काम सुरू असून, निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एम-24 आणि एम-26 यांसारख्या इतर मार्गांचेही नियोजन आणि डीपीआर तयार असून ते मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहेत.

एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळ किंवा इतर भागात जाण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हे मेट्रोचे जाळे लवकरात लवकर उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचेही विजय सिंघल म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news