Mumbai Local Train : १५ डब्यांची लोकल मुंबईकरांच्या किती फायद्याची ?

५४ लोकल फेऱ्या १५ डब्यांच्या केल्या : वस्तुस्थिती पडताळणीसाठी मध्य रेल्वेकडून हालचाली
Mumbai Local Train
Mumbai Local Trainpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून १२ डब्यांच्या लोकल गाड्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर केले जात आहे. २०२६ पर्यंत एकूण ५४ लोकल फेऱ्या १५ डब्यांच्या करण्यात आल्या असून आणखी १८ फेऱ्या १५ डब्यांच्या करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. मात्र, रेल्वेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचा खरोखरच मुंबईकरांना फायदा होत आहे का आणि त्याचा प्रवाशांना प्रत्यक्ष किती फायदा होत आहे, याची पडताळणी विविध स्तरांवर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून प्रत्यक्ष प्रवाशांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच त्रयस्थ संस्थेकडूनही या निर्णयाच्या फायद्यांची पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय मध्य रेल्वे प्रवाशांसाठी काम करणाऱ्या प्रवासी संघटनांशीही याबाबत विचारविनिमय केला जात आहे. यासाठी स्वतः मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेश मिश्रा यांनी पुढाकार घेऊन प्रवासी संघटनांना आपल्या सूचना देण्याचे आवाहन केल्याचे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर देसाई यांनी सांगितले.

Mumbai Local Train
EPFO Startup Investments : पीएफचा निधी स्टार्टअपमध्ये गुंतवणार

मध्य रेल्वेने १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. मात्र, तरीही ठाणे आणि त्यापुढील स्थानकांवर सुरू असलेली कामे अधिक गतीने पूर्ण करणे आणि लोकल वेळेवर चालवणे शक्य झाल्यास या १५ डब्यांच्या गाड्यांचा प्रवाशांना अधिक फायदा होईल, असे मत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नव्याने रूपांतर करण्यात आलेल्या १५ डब्यांच्या लोकलमध्ये तीन डबे महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे. आता या रचनेत कोणताही बदल केल्यास महिला प्रवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा कल्याण, कर्जत, कसारा व खोपोली येथे स्थानक विस्ताराची जी नव्याने कामे सुरू आहेत, ती लवकर पूर्ण झाल्यास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. रेल्वे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे म्हणणे आहे.

Mumbai Local Train
Shirur accident news: कीर्तनाहून घरी परतताना काळाचा घाला; आंबळे अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू