Cama Hospital Mumbai: कामा रुग्णालयाच्या मदर मिल्क बँकेत संगीत थेरपीचा चमत्कार; दूध संकलन दुप्पट

तणावमुक्त वातावरणाचा सकारात्मक परिणाम; तीन वर्षांत संकलनात लक्षणीय वाढ, तज्ज्ञांचे निष्कर्ष
Cama Hospital Mumbai
Cama Hospital MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : कामा रुग्णालयातील मदर मिल्क बँकेत संगीत थेरपीमुळे दूध संकलनात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. नवजात बालकांना आईचे दूध देणाऱ्या मातांची संख्या कमी होत असतानाही, शांत वातावरणात संगीत ऐकवून दूधदान प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून आला आहे. अवघ्या तीन वर्षांत दूध संकलन जवळजवळ दुप्पट झाले आहे.

Cama Hospital Mumbai
Belapur Hills Landslide Protest: बेलापूर टेकड्यांसाठी पुन्हा मानव साखळी; भूस्खलनाच्या धोक्यावर नागरिकांचा इशारा

आईच्या दुधाचे उत्पादन मुख्यत्वे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन या संप्रेरकांवर अवलंबून असते. प्रोलॅक्टिन दुधाच्या निर्मितीस चालना देते. ऑक्सिटोसिन लेट-डाऊन रिफ्लेक्स नियंत्रित करते. तणाव वाढल्यास शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे ऑक्सिटोसिन स्रावावर परिणाम होतो आणि दुधाचा प्रवाह कमी होऊ शकतो. शांत संगीतामुळे तणाव कमी होतो, कोर्टिसोल घटतो आणि ऑक्सिटोसिनचे स्रवण सुधारते. त्यामुळे दुधाचे प्रमाण आणि प्रवाह दोन्ही वाढतात.

Cama Hospital Mumbai
Jadhavji Mansion Colaba High Court: कुलाब्यातील जाधवजी मॅन्शनवर उच्च न्यायालयाची कडक भूमिका; अतिरिक्त मजले पाडण्याचे संकेत

संशोधकांच्या निष्कर्षानुसार, मूक आणि शांत संगीत थेरपी शरीरातील नैसर्गिक न्यूरो-हार्मोनल प्रक्रियांना चालना देऊन आईच्या दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यास प्रभावी ठरते. तणाव दुधाच्या प्रवाहात अडथळा आणतो, तर शांतता आणि विश्रांती त्यात सकारात्मक वाढ घडवतात.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, जन्मानंतर लगेच मिळणारे जाड, पिवळसर कोलोस्ट्रम बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र काही मातांना वैद्यकीय कारणांमुळे बाळाला दूध देता येत नाही. अशा वेळी रुग्णालयातील मदर मिल्क बँक ही नवजातांसाठी जीवनदायी ठरते.

Cama Hospital Mumbai
Maharashtra AI for Agriculture Policy: कृषी क्षेत्रात एआय क्रांती; परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

दूध संकलनात अशी झाली वाढ (मिली)

2023 मध्ये 2,73,070

2024 मध्ये 4,15,661

2025 मध्ये 5,20,918

दात्या मातांची संख्या घटली

2023 मध्ये 4,811 असलेली दात्या मातांची संख्या 2024 मध्ये 2,185 आणि 2025 मध्ये 1,646 पर्यंत घटली. जुलै 2024 पासून संगीत थेरपी सुरू केल्यानंतर दूध उत्पादनात स्पष्ट वाढ दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news