BMC illegal demolition case: नियमबाह्य पाडकाम केल्यास पुन्हा बांधकामाचे आदेश देऊ; उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सज्जड दम

पालिकेच्या 24 एप्रिल 2023 च्या परिपत्रकानुसार, बेकायदा इमारतीचे पाडकाम करण्यापूर्वी रहिवाशांना 15 दिवसांची नोटीस किंवा वैयक्तिक सुनावणी देणे आवश्यक आहे.
Bombay High Court
Bombay High Courtfile photo
Published on
Updated on

मुंबई: मालाड येथील एका इमारतीवरील कारवाईच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या मुजोरीवर ताशेरे ओढले. महापालिकेने नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे पाडकाम केले असेल तर, पालिका अधिकाऱ्यांच्या खर्चाने संबंधित इमारत पुन्हा बांधण्याचे आदेश दिले जातील, असा सज्जड दम न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिला.

केवळ नोटीस बजावली म्हणजे पाडकाम करण्याचा अधिकार मिळत नाही. कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करणे अनिवार्य आहे, असेही न्यायालयाने ठणकावले. पालिकेच्या 24 एप्रिल 2023 च्या परिपत्रकानुसार, बेकायदा इमारतीचे पाडकाम करण्यापूर्वी रहिवाशांना 15 दिवसांची नोटीस किंवा वैयक्तिक सुनावणी देणे आवश्यक आहे.

Bombay High Court
Navi Mumbai water shutdown: पाणी जपून वापरा! नवी मुंबईत उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद

मात्र, मालाडच्या प्रकरणात संबंधित नियमाचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. पालिकेच्या कारवाईवर आक्षेप घेत अशोक कुळे यांनी याचिका दाखल केली असून याचिकाकर्त्या कुळे यांच्या वतीने ॲड. जनय जैन यांनी युक्तीवाद केला.

त्यांच्या युक्तीवादाची गंभीर नोंद न्या.मिलींद जाधव यांच्या एकलपीठाने घेतली. जर इमारतीवरील पाडकामाची कारवाई चुकीची आढळली, तर त्याचे परिणाम संबंधित अधिकाऱ्यांना भोगावे लागतील. प्रसंगी त्यांच्या पगारातून वसुली करून पुन्हा इमारत बांधकाम उभे केले जाईल, असे न्यायालयाने सुनावले. याप्रकरणी 18 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

Bombay High Court
Class 11 online admission: अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; शालेय दाखला, मूळ गुणपत्रिकेचा प्रश्न ऐरणीवर

सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

पालिकेने घाईघाईने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे न्यायालयाने पालिकेला या प्रकरणी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणीपर्यंत संबंधित जागेवर पाडकाम करण्यास मनाई केली. प्रशासनाने आपली शक्ती नागरिकांना त्रास देण्यासाठी वापरू नये, अशी ताकीद न्यायालयाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news