BMC Committee Members: मुंबई महापालिकेच्या विशेष सभेकडे लक्ष; समिती सदस्यांच्या घोषणेसह अध्यक्षपदाची रंगणार चुरस

16 फेब्रुवारीला गटनेत्यांची अधिकृत घोषणा; स्थायी, सुधार व शिक्षण समितीत वर्णीसाठी नगरसेवकांची जोरदार लॉबिंग
BMC Committee Members
BMC(File Photo)
Published on
Updated on

स्थायी समितीचे सदस्य : 26 (शिक्षण समिती अध्यक्ष पदसिद्ध सदस्य)

सुधार समिती

सदस्य : 26

शिक्षण समिती सदस्य : 22 नगरसेवक व

4 बिगर नगरसेवक

एकूण 26

बेस्ट समिती : 16

BMC Committee Members
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवे वळण; प्रमोद हिंदुरावांचा प्रफुल्ल पटेलांवर सूचक आरोप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे विशेष सभागृह सोमवार 16 फेब्रुवारीला बोलावण्यात आले असून यावेळी सभागृह नेते व विरोधी पक्षनेत्यांसह गटनेत्यांची अधिकृत घोषणा होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी समिती सदस्यांची नावेही जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे समित्यांचे अध्यक्षपदासाठी कोण दावेदार असणार, हे स्पष्ट होणार आहे.

BMC Committee Members
Mandovi Express Delayed: मांडवी एक्स्प्रेस तब्बल 3 तास उशिरा; कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा गोंधळ

मुंबई महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यात वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह विशेष समिती व प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीचा समावेश आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेची विशेष सभा सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.

BMC Committee Members
Konkan Petroglyphs Research: कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क

या सभेत सभागृह नेते म्हणून गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, यांच्या नावासह शिवसेना गटनेते अमेय घोले, काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी, एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांच्या नावाची घोषणा होणार आहे. या घोषणेसह विविध समित्यांवर जाणाऱ्या सदस्यांच्या नावाचीही घोषणा होणार असून याबाबतचे पत्र सर्व पक्षांच्या गटनेत्यांमार्फत महापालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे.

BMC Committee Members
Supriya Sule | रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक, महिनाभरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील- सुप्रिया सुळे

बंदिस्त पत्र उघडून महापौर सदस्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. या नावांची घोषणा झाल्यानंतर समित्याच्या अध्यक्षपदासाठी कोण दावेदार असू शकतात याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे समितीच्या सदस्यपदी आपली वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षांतील वरिष्ठ नगरसेवकांसह नवख्या नगरसेवकांनीही जोरदार बिल्डिंग लावली आहे. विशेषतः स्थायी व सुधार समितीत जाण्यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news