Protest Against Harshavardhan Sapkal: भाजयुमोची दादरमध्ये हर्षवर्धन सपकाळांविरोधात तीव्र निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्याचा निषेध; जाहीर माफीची मागणी
Protest Against Harshavardhan Sapkal
Protest Against Harshavardhan SapkalPudhari
Published on
Updated on

मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.त्यांच्या या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबई येथे रविवारी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे निदर्शने करण्यात आली.

Protest Against Harshavardhan Sapkal
Mumbai Vijaydurg Ro Ro Service: अवघ्या पाच तासांत मुंबई ते सिंधुदुर्ग; रो-रो सेवा एप्रिलमध्ये सुरू होणार, तिकीटांचे दर किती?

दादर (पूर्व)येथील स्वामी नारायण मंदिरासमोर सायंकाळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला चपलाने जोडे मारून निषेध करण्यात आला तर याप्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी केली.युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष नगरसेवकं तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली.

Protest Against Harshavardhan Sapkal
Mira Bhayandar Cluster Scheme: मिरा-भाईंदर क्लस्टर योजनेवर 18 फेब्रुवारीला महासभेत निर्णायक चर्चा; रहिवाशांच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह?

यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, राष्ट्रगौरव आणि हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत,स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत.त्यांनी अन्याय,अत्याचार व परकीय आक्रमकांविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.त्यांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान याच्याशी करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या अयोग्य आहे.

Protest Against Harshavardhan Sapkal
Rajendra Lodha ED Arrest: 85 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात राजेंद्र लोढा यांना ईडीकडून अटक

छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्याबद्दलचे वक्तव्य महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे आहे. हा संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेवर आघात करणारे आहे. या निदर्शनात वॉर्ड पदाधिकारी, शिवप्रेमी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news