Anant Chaturdashi Special Local|गणेशभक्तांसाठी गुड न्यूज! अनंत चतुर्दशीच्या रात्री १२ विशेष लोकल; चर्चगेट-विरार प्रवास सोपा

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट-विरार दरम्यान १२ विशेष लोकल धावणार असून त्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
Mumbra Local Train
Mumbra Local Trainpudhari photo
Published on
Updated on

मुंबई: अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांना रात्री उशिरापर्यंत लोकलने प्रवास करता यावा, म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट-विरार दरम्यान १२ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

तसेच या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. विसर्जनानंतर होणारी प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष लोकल

चर्चगेटहून विरारच्या दिशेने धावणाऱ्या डाऊन मार्गावरील विशेष लोकल रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत चालवल्या जाणार आहेत.

Mumbra Local Train
Mumbai Metro 4 Accident: मेट्रोच्या बांधकामादरम्यान अपघात; दोन कामगारांचा मृत्यू

तसेच विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील विशेष लोकल रात्री १२.१५ ते पहाटे ३ या कालावधीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे विसर्जनानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या भाविकांना अतिरिक्त लोकलमधून सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच २५ सप्टेंबरला चर्नी रोड स्थानकावरही काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

Mumbra Local Train
Mumbai Housing Market: मुंबईकरांचे प्राधान्य लहान घरांना; ३ बीएचके घरांना सर्वात कमी मागणी

दरम्यान, सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत धावणाऱ्या ३७ जलद अप लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मात्र, १५ डब्यांच्या लोकल ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच अप मार्गावर सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत चर्नी रोडच्या फलाट क्रमांक २ वर थांबा दिला जाणार नाही.

अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था

गणपती विसर्जनाच्या दिवशी चर्नी रोड परिसरात मोठी गर्दी होते. तेव्हा प्रवाशांना तिकीट काढताना अडचणी येऊ नयेत, यासाठी अतिरिक्त तात्पुरत्या तिकीट खिडक्या सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news