Mumbai Housing Market: मुंबईकरांचे प्राधान्य लहान घरांना; ३ बीएचके घरांना सर्वात कमी मागणी

मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींचा परिणाम घरखरेदीवर दिसत आहे. महामुंबईत ३ बीएचके घरांना केवळ ३९ टक्के ग्राहकांची पसंती असून लहान घरांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
Mumbai Housing Market
Mumbai Housing Marketpudhari photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील जागांचे वाढते दर पाहाता येथील श्रीमंत ग्राहकवर्गालाही मोठी घरे परवडेनाशी झाली आहेत. परिणामी, ३ बीएचके घरांच्या मागणीत देशभरातील मोठ्या शहरांचा विचार करता महामुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी येतो. ३ बीएचके घरांना येथे सर्वात कमी मागणी आहे.

देशभरातील १४ शहरांमधील ८ हजार ३२० ग्राहकांशी अनारॉकने संवाद साधला. यापैकी ४८ टक्के ग्राहकांनी ३ बीएचके घरांना पसंती दिली आहे.

त्यांचे बजेट ९० लाख ते दीड कोटींच्या दरम्यान आहे. ३८ टक्के ग्राहकांनी २ बीएचकेला पसंती दिली आहे. ४ बीएचके आणि त्यापेक्षा मोठ्या घरांना २०२४च्या पहिल्या सहामाहीत ३ टक्के प्राधान्य होते. आता हे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

Mumbai Housing Market
Maratha Reservation : मराठा समाजाच्‍या ‘एसईबीसी’ आरक्षण वैधतेवर पुन्हा सुनावणी

घर खरेदी करताना ३ बीएचकेला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांमध्ये अहमदाबादचा क्रमांक सर्वात वरचा आहे. येथे ५७ टक्के ग्राहक ३ बीएचके पसंत करतात. चेन्नई आणि दिल्ली येथे हे प्रमाण ५३ टक्के तर हैदराबाद येथे ५२ टक्के आहे. बंगळुरू आणि कोलकाता येथील ४६ टक्के ग्राहकांचा कल ३ बीएचके घरांकडे आहे.

Mumbai Housing Market
Eknath Shinde Mobile : लंडनहून परतताना एकनाथ शिंदे विमानातच विसरले मोबाईल; पहाटे यंत्रणांची उडाली एकच धावपळ!

महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यात या प्रकारच्या सदनिकांना ४७ टक्के मागणी आहे. मुंबईत मात्र दर चौरस फुटाची किंमत वेगाने वाढत असून ग्राहक लहान घरांकडे वळत आहेत. महामुंबईत ३ बीएचके घरांना सर्वात कमी म्हणजेच केवळ ३९ टक्के मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news