Mumbai Metro 4 Accident: मेट्रोच्या बांधकामादरम्यान अपघात; दोन कामगारांचा मृत्यू

मुंबईतील मेट्रो ४ मार्गिकेच्या वडाळा येथील बांधकामादरम्यान तात्पुरते उद्वाहन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. एमएमआरडीएने कंत्राटदाराला ५ कोटींचा आणि सल्लागारांना १ कोटींचा दंड ठोठावला.
Mumbai Metro 4 Accident
Mumbai Metro 4 AccidentPudhari
Published on
Updated on

मुंबई: फेब्रुवारीमध्ये बांधकामातील काही भाग कोसळून गंभीर अपघात झाल्यानंतर मेट्रो ४ मार्गिकेवर पुन्हा एकदा अपघात होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. १२ सप्टेंबरला वडाळा येथे ही घटना घडली. पहिल्या मजल्यावरून खाली येण्यासाठी बांधण्यात आलेले तात्पुरते उद्वाहन कोसळून हा अपघात झाला.

वडाळा-कासारवडवली मेट्रो ४ ही ३२.३२ किमीची मार्गिका आहे. या मार्गिकेवर ३० स्थानके असून गायमुख ते कॅडबरी जंक्शन या टप्प्यातील मेट्रो वर्षअखेरीस सुरू केली जाणार आहे.

Mumbai Metro 4 Accident
Mumbai Housing Market: मुंबईकरांचे प्राधान्य लहान घरांना; ३ बीएचके घरांना सर्वात कमी मागणी

उर्वरित मार्गिकेचे काम अद्याप सुरू आहे. वडाळा येथे बांधकाम सुरू असलेल्या भागात तात्पुरते उद्वाहन लावण्यात आले आहे. दोन कामगार त्यातून खाली येत असताना उद्वाहन कोसळले. यात दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये मुलुंड येथे याच मार्गिकेच्या बांधकामातील काही भाग चालत्या रिक्षावर कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा शनिवारी ही घटना घडल्याने बांधकामाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भक्तिपार्क मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान घडलेल्या या अपघाताप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी तारीक अल इस्लाम या पर्यवेक्षकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Mumbai Metro 4 Accident
UPI Charges : पेट्रोल पंपावर ‘UPI Payment’ बंद होणार? मुंबईत पंप चालकांनी सरकारला इशारा

कंत्राटदाराला ५ कोटींचा दंड

एमएमआरडीएने कंत्राटदार आरइन्फ्रा-अस्ताल्डी जेव्ही यांच्यावर ५ कोटी, तर सल्लागार समूहातील डीबी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग, हिल इंटरनॅशनल इन्क. आणि लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रा. लि. यांच्यावर १ कोटींचा दंड ठोठावला आहे.

प्राथमिक निष्कर्षांमध्ये उपकंत्राटदाराच्या पर्यवेक्षणात त्रुटी आढळून आल्या आहेत. एमएमआरडीएने सर्व कंत्राटदार, उपकंत्राटदार आणि सल्लागारांना निर्धारित सुरक्षा प्रक्रिया, वैधानिक नियम आणि करारातील अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news