Amitabh Bachchan Threat : अमिताभ बच्चन यांना अमेरिकेतून पन्नूची धमकी

‘जलसा’बाहेर खलिस्तान समर्थक जलसा घेण्याचे आवाहन
Amitabh Bachchan Threat
Amitabh Bachchanpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि बंदी घातलेल्या ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) या संघटनेचा प्रमुख गुरपतवंतसिंग पन्नू याने अमिताभ बच्चन यांना लक्ष्य करत त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर खलिस्तानी जलसा आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

हा जलसा आयोजित करणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. १९ ते २७ नोव्हेंबरदरम्यान हा जलसा घेण्याचे आवाहन करण्यात आल्याने मुंबई पोलिसांसमोर सुरक्षेचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

Amitabh Bachchan Threat
Jensen Huang: जेन्सन हुआंग यांच्यासाठी एनव्हिडियाचे दरवाजे कायमचे बंद? संचालक मंडळाने घेतला मोठा निर्णय

पन्नूने आपल्या संदेशात १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा संदर्भ देत बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर बच्चन यांनी चिथावणीखोर घोषणा दिल्याचा आरोप पन्नूने पुन्हा केला आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी असे आरोप फेटाळले आहेत. ‘बच गए या फंस गए’ अशा सूचक शब्दांत पन्नूने बच्चन यांना सोशल मीडियावरून संदेश दिला आहे.

दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजीच कुख्यात गुंड गोल्डी धिल्लन याने अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना समाजमाध्यमांवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबईत आपले २०० साथीदार सक्रिय असल्याचा दावाही त्याने केला आहे. बुलेटप्रूफ सुरक्षा व्यवस्थाही त्यांना वाचवू शकणार नाही, असा इशारा त्याने दिला.

Amitabh Bachchan Threat
Onion Plantation Labour Charges: कांदा लागवडीची मजुरी १२०० रुपयांवर; शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

एकाच दिवशी पन्नू आणि गोल्डी धिल्लन यांच्याकडून धमकीवजा संदेश समोर आल्याने बच्चन कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे. मात्र, या दोन्ही धमक्यांचा परस्पर संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पन्नूच्या मेळाव्याच्या आवाहनाची आणि धमकीच्या संदेशाची मुंबई पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

सातत्‍याने धमक्या

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या ई-मेलद्वारे देण्यात आल्या होत्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अमिताभ यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या कथित कटाशी संबंधित विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोघांना अटक केली. या आरोपींचे परदेशात असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.