Jensen Huang: जेन्सन हुआंग यांच्यासाठी एनव्हिडियाचे दरवाजे कायमचे बंद? संचालक मंडळाने घेतला मोठा निर्णय

जेन्सन हुआंग यांच्या 'एनव्हिडिया'मध्ये परतण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हुआंग यांचा राजीनामा सर्वानुमते स्वीकारला आहे.
Jensen Huang
Jensen Huang File Photo
Published on: 
Updated on: 

Jensen Huang

वॉशिंग्टन : जेन्सन हुआंग यांच्या 'एनव्हिडिया'मध्ये परतण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हुआंग यांचा राजीनामा सर्वानुमते स्वीकारला असून, त्यांना पुन्हा सीईओपदी नियुक्त करण्याचा कोणताही विचार नसल्याचे 'एनव्हिडिया'चे अध्यक्ष हार्वे जोन्स यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

कंपनीच्या त्रैमासिक आर्थिक निकालांवरील बैठकीत बोलताना जोन्स यांनी सांगितले की, संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा एकमताने स्वीकारला आहे आणि त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त करण्याची कोणताही विचार नाही.

Jensen Huang
Jensen Huang Net Worth: एनव्हिडिया सोडल्यास जेन्सन हुआंग यांना ९०० कोटींचे नुकसान; त्यांच्याकडे किती आहे एकूण संपत्ती?

विवाहबाह्य संबंध आणि इतर कथित संबंधांबाबतच्या खुलाशांनंतर, गेल्या आठवड्यात हुआंग यांनी कंपनीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आपल्या पहिल्या सार्वजनिक निवेदनात त्यांनी म्हटले होते की, जर संचालक मंडळाला असे वाटत असेल की त्यांच्या परतण्यामुळे कंपनी, भागधारक, कर्मचारी आणि देशाचे हित साधले जाईल, तर त्यांना परत येण्यास आनंदच होईल. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात गंभीर चुका केल्याचेही मान्य केले होते.

हुआंग यांच्या संभाव्य पुनरागमनाला टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाठिंबा दर्शवला होता. त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करावे, अशी मागणी करणारी एक ऑनलाइन याचिकाही सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, 'एनव्हिडिया'च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये हुआंग यांच्या जाण्याबाबत किंवा त्यांच्या परतण्याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. कंपनीने ११६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असून 'वॉल स्ट्रीट'च्या अंदाजांपेक्षाही अधिक आहे.

Jensen Huang
Nvidia Jensen Huang: एनव्हिडियाचे CEO जेन्सन यांची किती अफेअर्स? आता कंपनीतीलच एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.