Amit Satam: 'मोदींना देश चालवण्याचे धडे देताय, आधी तुमचा…'; अमित साटम यांचा जावेद अख्तर-शबाना आझमींवर घणाघात, राजकीय वर्तुळात खळबळ

Amit Satam Javed Akhtar Shabana Azmi: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर जोरदार टीका केली.
Amit Satam Javed Akhtar Shabana Azmi
Amit Satam Javed Akhtar Shabana AzmiPudhari
Published on: 
Updated on: 

Amit Satam Javed Akhtar Shabana Azmi: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होत शबाना आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित साटम यांनी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

अमित साटम यांनी आरोप केला की, जावेद अख्तर खासदार असताना त्यांच्या माध्यमातून इर्ला नाल्याच्या कामासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण झाले नाही. जनतेचा पैसा खर्च करूनही एकही प्रकल्प पूर्ण करता आला नाही, असा दावा साटम यांनी केला.

याच मुद्द्यावरून साटम यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींना देश कसा चालवायचा, याचे धडे देण्यापूर्वी स्वतःच्या कामाचा हिशेब द्यावा, असा टोला लगावला.

‘जनतेच्या पैशातून प्रकल्प पूर्ण केला नाही, मात्र बंगला पूर्ण केला’

अमित साटम यांनी जावेद अख्तर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. जनतेच्या पैशातून करण्यात येणारे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, मात्र खंडाळ्यातील ‘सुकून’ नावाचा बंगला मात्र पूर्ण बांधून झाला, अशा शब्दांत साटम यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली.

Amit Satam Javed Akhtar Shabana Azmi
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचं आश्रम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता मुलगा आणि महिला बेपत्ता, कुटुंबीय थेट आंदोलनाला बसले

दरम्यान, शबाना आझमी यांनी क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अमित साटम यांनी त्यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले.

Amit Satam Javed Akhtar Shabana Azmi
Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पठाण, अ‍ॅनिमल आणि धुरंधरला टाकलं मागे, किती कोटी कमावले?

साटम यांच्या या टीकेमुळे जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्याविरोधातील भाजपची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांच्या आरोपांवर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news