

Ajit Pawar Plane Crash: नुकतेच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चौकशी हा होत नाही असा प्रश्न पुन्हा विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंह यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचा आरोप केला. यानंतर खरोखरच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता की घातपात झाला याबाबत चर्चा सुरू झाली.
याबाबत आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. एव्हिएशन विषयक अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार असलेल्या चंदावरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये अजित पवारांच्या विमान अपघातंवेळीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यावरून हा शंभर टक्के घातपात नसून तो अपघातच असल्याचा दावा केला.
ते म्हणाले, 'तुम्ही जर बारामतीचे सीसीटीव्ही व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की हे विमान लिअर जेट क्रॅश... हे लिअर जेट नाही, हे डीसी-९ (DC-9) आहे; पण ते तेच डिझाईन आहे, म्हणजे सेम डिझाईन आहे, म्हणून मी ते आणलंय. हे क्रॅश होत असताना ते असं उतरताना ते एकदम असं होऊन असं झालेलं आहे पूर्ण. आणि हे तुम्ही बघा सीसीटीव्हीमध्ये, आणि मग ते असं क्रॅश झालेलं आहे पूर्ण. हे मी का सांगतोय तुम्हाला की इंजिन्स मागे आहेत आणि विमानाचा वेग अति आहे, तर त्याचा जो टर्न आहे तो अति होऊन ते विमान क्रॅश झालं असं तुम्हाला दिसतंय.'
रोहित चंदावरकर पुढे म्हणाले की, 'कमी विजिबिलिटीमध्ये पायलट हा पहिल्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला यश आलं नाही, त्यामुळे तो परत वरती गेला. पूर्ण वळून असा आला आणि दुसऱ्या वेळी सुद्धा विजिबिलिटीमुळे किंवा अन्य कारणामुळे त्याचं जे काही अलाईमेंट असते रनवेची, त्या रांगेत त्याला जायचं असतं. ते शेवटच्या क्षणी चुकलं, त्याच्यामुळे त्यांनी तो एकदम शेवटच्या क्षणी असा टर्न घेतलाय, म्हणून तुम्हाला ते सीसीटीव्हीमध्ये दिसलंय. तो टर्न त्यांनी एवढा घेतला नसता तर ते रनवे आणखी पुढे असते, त्याला जमलं नसतं; म्हणून त्यांनी तो खूप जास्त घेतला, हे सीसीटीव्हीमध्ये दिसतंय.'
चंदावरकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचे मूळ कशात लपलं आहे याचा देखील उलगडा करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, शेवटचा जो टर्न आहे, त्याच्यामध्ये त्या विमानाच्या अपघाताची मूळ लपलेली आहेत असं माझी असेसमेंट आहे, अनेक पायलटची असेसमेंट आहे, एव्हिएशनचा अभ्यास करणाऱ्या अनेकांचा देखील हाच अंदाज आहे. आता हे मी तुम्हाला बेसिक दाखवल्यावर आणि हे सांगितल्यावर लास्ट पॉईंट मी हा मांडतो की तुम्ही लक्षात घेऊ शकता की एवढं हे सगळं घातपात करून होऊ शकतं का? हा घातपात असण्याची शक्यता फार कमी, शून्य आहे जवळजवळ.'