Mumbai Airoli Katai road | ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्त्याचे दोन टप्पे तयार

Mumbai Airoli Katai road | ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्त्याचे दोन टप्पे तयार
Airoli Katai Elevated Road
Airoli Katai Elevated RoadPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील दोन टप्पे या वर्षाच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ या पहिल्या टप्प्याचे व ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पहिला टप्पा ठाणे - बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग - ४ असा असून, या टप्प्याची लांबी ३.४३ किमी आहे. या टप्प्यात एक दुहेरी बोगदा असून, तो १.६९ किमी लांबीचा आहे. त्याची रुंदी १७.५० मीटर आहे. तर उन्नत मार्ग ०.९४ किमी लांबीचा आहे. पहिल्या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा व कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ४ ला अखंड जोड मिळणार आहे. ऐरोली ते ठाणे बेलापूर रोडदरम्यानचा २.५७ किमी लांबीचा दुसरा टप्पा असून यात तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टचा समावेश आहे.

ऐरोली ते कटाई नाका हा संपूर्ण रस्ता कार्यान्वित झाल्यानंतर मुलुंड ते कटाई नाका या प्रवासाचे अंतर ७ ते ८ किमीने कमी होण्याची, तर ठाणे ते नवी मुंबई प्रवासात ३५ ते ४० मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील दळवळण सुलभ करणाऱ्या ऐरोली-कटाई नाका कॉरिडॉर प्रकल्पातील पहिले दोन टप्पे डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. यामुळे महापे, शिळफाटा व कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ४ वर जाता येईल. मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा ही ठिकाणे थेट जोडली जातील.

Airoli Katai Elevated Road
Airoli Theatre: १२ वर्षांची प्रतीक्षा संपणार! ऐरोली नाट्यगृहाचे काम ९० टक्के पूर्ण; २०२६ मध्ये पडदा उघडणार

प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी होणार कमी

या प्रकल्पामुळे ऐरोली, मुंब्रा व कटाई नाका यांना अखंड रस्त्याने जोडणी मिळणार असून प्रवासाचे अंतर ३५ ते ४० मिनिटांनी कमी होईल. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल व नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व बदलापूर दरम्यान जलद प्रवास करता येईल. हा प्रकल्प तीन टप्प्यांत नियोजित आहे. प्रत्यक्ष मार्गावर, दरड परिसर व बोगद्यात सुरक्षा उपाययोजना करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Airoli Katai Elevated Road
Airoli Katai Elevated Road: जुलैत धावणार बहुप्रतीक्षित ऐरोली-काटई उन्नत मार्ग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.