Abhijit Dipke CJP: अभिजीत दीपकेंना NDA ची ऑफर; मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांचे पक्षात येण्याचे आमंत्रण

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्याची ऑफर मिळाली आहे.
Abhijit Dipke
Abhijit DipkeFile Photo
Published on
Updated on

Abhijit Dipke

मुंबई: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्याची ऑफर मिळाली आहे. केंद्र सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी दीपके यांना आपल्या पक्षात येण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाज व पक्षाला बळकटी देण्यासाठी दीपके यांनी आरपीआय (ए) मध्ये प्रवेश करावा, असे आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, या ऑफरवर दीपके यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

राजकारणात तात्काळ प्रवेशास दीपके यांचा नकार

अभिजीत दीपके यांनी मात्र सध्या राजकारणात थेट प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर 'बहुसंख्य जनतेची तशी इच्छा असेल', तर भविष्यात यावर विचार केला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले. "भारतात नवीन राजकीय पक्ष स्थापन करणे हा सर्व समस्यांवरचा एकमेव उपाय असू शकत नाही," असेही त्यांनी म्हटले आहे.

Abhijit Dipke
Jharkhand student protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे झारखंड सरकार झुकलं; वादग्रस्त भरती परीक्षा रद्द, CBI चौकशीवर पेच कायम

CJP राजकीय पक्षात रुपांतर करणार?

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात CJP च्या राष्ट्रीय कार्यसमितीची रचना करण्यात आली होती. त्यावेळी पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी स्पष्ट केले होते की, CJP चे सध्या राजकीय पक्षात रुपांतर केले जाणार नाही. "लोकांची इच्छा असली तरीही केवळ एक नवीन पक्ष स्थापन करण्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा, आम्ही थेट जमिनीवर उतरून लोकजागरूकतेचे काम करणार आहोत," असे दास यांनी स्पष्ट केले होते.

'शाळा दुरुस्त करा' अभियानाची सुरुवात

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावातून 'शाळा दुरुस्त करा' या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. सरकारी शाळांच्या खालावलेल्या दर्जाबद्दल सरकारला धारेवर धरत, याचा सर्वाधिक फटका गरीब विद्यार्थ्यांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच खासगी शाळांच्या शुल्कावर मर्यादा आणण्याची मागणीही त्यांनी केली.

"देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली तरीही सरकारी शाळांमध्ये पिण्याचे पाणी, तुटलेल्या खिडक्या आणि बसायला बाक नसतील, तर देशाचा विकास कसा होणार?" असा सवाल दीपके यांनी केला. महाराष्ट्र आणि देशभरातील शाळांमधील सुविधांचा डेटा गोळा केला जात असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील इतर तालुक्यांसह राजस्थानमधील सरकारी शाळांची पाहणी केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शाळांनंतर सरकारी रुग्णालयांच्या दुरावस्थेविरोधातही असेच आंदोलन उभारण्याचा इशारा CJP ने दिला आहे.

Abhijit Dipke
Shehzad Poonawalla : प्रवक्त्याला पगार मिळत नाही, शेहजाद पूनावाला म्हणाले; पुढे काय करणार ते सांगितले..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news