नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्याच्या मागणीसाठी मूकमोर्चा

नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्याच्या मागणीसाठी मूकमोर्चा

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : थोर समाजसुधारक नाना शंकरशेठ यांनी लोक कल्याणासाठी हजारो एकर जमीन दान केली. त्यांचे नाव मुंबई सेंन्ट्रल रेल्वे टर्मिनसला द्यावे, या मागणीकडे केंद्रसरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि.) मूकमोर्चा काढण्यात आला.

१६ एप्रिल या रेल्वेदिनाचे औचित्य साधून नाना शंकरशेठ चौक ते मुंबई सेंट्रल टर्मिनसपर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. मूकमोर्चात नाना शंकरशेठ यांची तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांची वेशभूषा केलेले नाना समर्थक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाचे आयोजन नाना शंकरशेठ प्रतिष्ठान व अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे करण्यात आले होते. मोर्चात विविध भागांतून आलेले नानाप्रेमी सहभागी झाले होते.

गेल्या दहा वर्षांपासून मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस असे नामकरण करण्यासाठी प्रत्येक रेल्वेदिनाचे औचित्य साधून निदर्शने केली जातात. या संदर्भातील प्रस्ताव राज्यसरकारने मार्च २०२० ला मंजूर करून केंद्रसरकारकडे पाठवला आहे. तीन वर्ष उलटली तरी हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या मागणीनंतर आलेले रेल्वेस्थानक टर्मिनसच्या नाव बदलाचे प्रस्ताव मंजूर झाले असताना भारतात रेल्वे सुरू करण्यात सिंहाचा वाटा ज्यांचा होता त्यांचे नाव देण्यासाठी इतका उशीर का लागतो, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या. केंद्रसरकारने ३१ जुलैला नाना शंकरशेठ यांची १५८ वी पुण्यतिथी दिवशी त्यांचे नाव टर्मिनसला देण्याची घोषणा केली होती. यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आग्रह धरावा, अशी मागणी करण्यात आली होती.

यावेळी अ.भा.दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. मनमोहन चोणकर यांनी केंद्रसरकारने या मागणीकडे लक्ष घालावे अशी मागणी केली. या मोर्चात नानांचे पणतु विलास शंकरशेट, सुरेंद्र शंकरशेट, अजित शंकरशेट, डॉ. गजानन रत्नपारखी, दिनकर बायकेरिकर, चंद्रशेखर दाभोळकर आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news