बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू: २५ जणांवर उपचार सुरू

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू: २५ जणांवर उपचार सुरू

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="see more web stories" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील मोतिहारीमध्ये विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आणखी २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतिहारीच्या लक्ष्मीपूर पहारपूर, हरसिद्धी येथे बनावट दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. तर २५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधीही बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

गेल्या वर्षी सारण जिल्ह्यात बनावट मद्य सेवन केल्यामुळे ४० जणांचा मृत्यू झाला होता. सारण बनावट दारू प्रकरणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात प्रशासनाला दोषी ठरवण्यात आले होते. या अहवालावरून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात खडाजंगी सुरू झाली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news