omicron : मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ ! २४ तासात २ हजार ५१० रुग्णांची नोंद | पुढारी

omicron : मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ ! २४ तासात २ हजार ५१० रुग्णांची नोंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

मुंबईत कोरोना ( omicron ) रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल 2 हजार 510 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवार 28 डिसेंबरच्या तुलनेत बुधवार 29 डिसेंबरला रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. मुंबई महापालिकेने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोना ( omicron ) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह आपत्कालीन विभागाचे टेन्शन वाढले आहे. रुग्ण वाढत असलेल्या विभागाकडे पालिकेने आपले लक्ष केंद्रित केले असून आरोग्य पथके तैनात केली आहे.

मुंबईमध्ये रुग्णवावाढीचा दर 0.10 टक्केवर पोहचला आहे. तर रुग्णाला दुपटीचा दर सुमारे 4 हजार दिवसावरून 682 दिवसांवर आला आहे. गेल्या 24 तासात 51 हजार 843 कोरोना चाचणी करण्यात आली. तर एकाचा मृत्यू झाला असून अवघे 251 जण बरे झाले आहेत. तर मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 8060 झाली आहे.

 

Back to top button