मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे २८ डिसेंबरला सूप वाजणार | पुढारी

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे २८ डिसेंबरला सूप वाजणार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास महाविकास आघाडी सरकारने नकार दिल्याने, हिवाळी अधिवेशनाचे सूप २८ डिसेंबरला वाजणार आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबर पर्यंत ठरवण्यात आला होता. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत शुक्रवारी विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाली. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. परंतु ही मागणी सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांनी फेटाळली.

या बैठकीत आता २८ डिसेंबर पर्यंतचे कामकाज ठरले असल्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले. २७ डिसेंबरला पुरवणी मागण्यावर चर्चा, अंतिम आठवडा प्रस्ताव आणि शासकीय कामकाज होईल. तर २८ डिसेंबरला सत्तारुढ पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल, असे परब यांनी सांगितले.

हेही वाचा

व्हिडिओ पहा: अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद |monkey dogs gangwar in beed

Back to top button