देशात गतवर्षी १०६ वाघांचा मृत्यू; केंद्रीय वनमंत्र्यांची माहिती | पुढारी

देशात गतवर्षी १०६ वाघांचा मृत्यू; केंद्रीय वनमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला जातो. पंरतु, वाघांचे मृत्यू रोखण्यात सरकारला म्हणावे तितके यश मिळत नसल्याचे दिसून आले आहे. २०२० मध्ये विविध राज्यांमध्ये १०६ वाघांचा मृत्यू झाला. मात्र वाघांच्या शिकारींमध्ये घट झाल्याचे दिसून येत. अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार सन २०१९ मध्ये अवैध शिकारीच्या २७ घटना घडल्या. २०२० मध्ये केवळ १४ अवैध शिकारी झाल्याचे समोर आले आहे. विविध राज्यांकडून मिळालेल्या माहितीनूसार २०२० मध्ये वाघांच्या हल्ल्यात ४४ लोकांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये २० तर, २०१९ मध्ये ४४ वाघांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. अपघात तसेच संघर्षात ३ वाघांचा मृत्यू २०१९ मध्ये झाला आहे. तसेच सन २०२० मध्ये झालेल्या वाघांच्या मृत्यूच्या ७१ प्रकरणांचा अद्यापही तपास सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा

Back to top button