Good News : अमेरिकेच्या H1-B आणि इतर Work व्हिसासाठी १ वर्ष प्रत्यक्ष मुलाखती नाहीत | पुढारी

Good News : अमेरिकेच्या H1-B आणि इतर Work व्हिसासाठी १ वर्ष प्रत्यक्ष मुलाखती नाहीत

मुंबई : विविध प्रकारच्या Non Migrant Work व्हिसासाठी अमेरिकेच्या दूतावासात प्रत्यक्षात उपस्थित राहून मुलाखत देण्यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती १ वर्षांसाठी असणार आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटने हा निर्णय घेतला आहे.
३१ डिसेंबर २०२२पर्यंत ही स्थगिती असेल.
तात्पुरत्या व्हिसाधारकांच्या अमेरिकेच्या आर्थिक उन्नतीतील योगदान लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे प्रत्यक्षात मुलाखती न घेण्याचा निर्णय संबंधित दूतावास घेऊ शकतात.
हा निर्णय पुढील प्रकारच्या व्हिसासाठी लागू असणार आहे.
१. Person In speciality Occupation (H1 B visa)
2. Trainee or special Education Visitors (H3 visa)
3. Intra Company Transferees (L visa)
4. Individuals with extraordinary Ability and Achievements (0 visa)
5. Athletes, Artists and Entertainers (P visa)
6. Participants in International Cultural Exchange Programs (Q visa)
अशा प्रकारे प्रत्यक्षात मुलाखती न घेण्याचा निर्णय हा त्या-त्या अर्जानुसार घेण्यात येणार आहे.
या शिवाय International Student (F आणि M व्हिसा)आणि Student Exchange (J) या व्हिसासाठी मुलाखत न घेण्याचा निर्णय संबंधित दूतावास कार्यालय घेऊ शकेल.
काही व्हिसा अर्जांसाठी मुलाखती घेतल्या जाऊ शकतात, हा निर्णय स्थानिक परिस्थिती आणि अर्जांवर अवलंबून असणार आहे.
याशिवाय ज्यांची व्हिसाची मुदत संपली आहे, आणि त्याच प्रकारच्या व्हिसासाठी त्यांनी ४८ महिन्यांपूर्वी अर्ज केला असेल तर अशांच्या प्रत्यक्षात मुलाखतींसाठी बेमुदत स्थगिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ‘पाठीचा कणा कसा सांभाळाल?’ विषयावर जगद्विख्यात स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शन

Back to top button