cm thackeray : राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार ? मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तातडीने बैठक बोलावली

cm thackeray : राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार ? मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तातडीने बैठक बोलावली
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २३) रात्री १० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्ससमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेणार आहेत. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. (cm thackeray) कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा राज्याला कोणताही धोका पोहोचू नये या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सध्या ६५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता.

नाईट लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे बोलले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापार्श्वभुमिवर बैठक बोलावल्याने काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस सन आहे तसेच पुढच्या आठवड्यात ३१ डिसेंबर लोक साजरा करण्यासाठी लोक रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने यावर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

cm thackeray : देशात आतापर्यंत २३६ ओमायक्रॉन बाधित

देशात आतापर्यंत २३६ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.

सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित ६५ रुग्‍ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

तर दिल्ली ६४ आणि तेलंगणामध्‍ये २४ रुग्‍ण आढळले आहेत. देशातील जवळपास ९६ कोटी ६३ लाख ५०६ आरोग्य कर्मचार्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. तर, फ्रंटलाईन कर्मचार्‍यांचे १ कोटी ६८ लाख ३ हजार २५ संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज ४७ कोटी ४८ लाख ८० हजार ६३५ डोस पुरवले आहेत.

यातील १८ कोटी १२ लाख ७० हजार ७६ डोस अद्यापही राज्य,केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

देशात आतापर्यंत ६६ कोटी ८६ लाख ४३ हजार ९२९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या.

यातील १२ लाख ५ हजार ७७५ कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news