vaccination : निवडणुका होणाऱ्या राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवावा ; केंद्राचे निर्देश | पुढारी

vaccination : निवडणुका होणाऱ्या राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवावा ; केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात निवडणुका होणाऱ्या राज्यांमधील लसीकरणाचा वेग वाढवावा, असे निर्देश केंद्र सरकारने गुरुवारी दिले. कोरोनाचा ओमायक्रॉन स्ट्रेन झपाट्याने फैलावत आहे, या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जावी तसेच जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जावे, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (vaccination)

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, रुग्ण दुप्पट होण्याचा दर, ज्या भागात रुग्ण वेगाने वाढत आहेत, अशा भागांवर नजर ठेवणे आदी उपाय योजण्याचा सल्ला राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात ज्या लोकांना लस देण्याचे राहिले आहे, त्यांना लस देण्याबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला गती दिली जावी, असेही सरकारने नमूद केले आहे.

विशेषतः निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी लसीकरण वेगाने करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.

vaccination : सणासुदीच्या काळात प्रतिबंध लावण्याचेही निर्देश….

आगामी सणासुदीच्या काळात ठिकठिकाणी लोकांची गर्दी जमू नये, यासाठी प्रतिबंध लावावेत, असे सांगतानाच रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत राज्यांनी गांभीर्याने विचार करावा, असे सरकारने म्हटले आहे.

Back to top button