मुंबई : सिडकोकडून मेट्रो रेल्वेचे प्रवासी भाडे जाहीर | पुढारी

मुंबई : सिडकोकडून मेट्रो रेल्वेचे प्रवासी भाडे जाहीर

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : सिडकोकडून पहिला मार्ग क्रमांक एक (बेलापूर ते पेंधर) या ११ किमी मेट्रो रेल्वेचे प्रवासी भाडे दरपत्रकाबाबत सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी ट्टिटरवरून ही माहिती दिली. नवी मुंबई महापालिकेच्या एसी बसपेक्षाही पाच रूपये कमी तिकिटाचे भाडे मेट्रो रेल्वेचे असणार आहे. दोन किमी ते दहा किमीचे प्रवासी भाडे प्रती प्रवासी १० रूपयांपासून ४० रूपये असणार आहे.

सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी हा प्रकल्प लवकर पुर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयापर्यंत अथक प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले. आतापर्यंत चार वेळा त्यांनी प्रत्यक्षात या प्रकल्पाची अधिका-यांसोबत पाहणी केली आहे. सुरू होणारा पहिला मार्ग क्रमांक एक बेलापूर ते पेंधर या ११ किमीवर मेट्रो रेल्वेच्या आतापर्यंत झालेल्या तीन चाचणीला ते प्रत्यक्षात उपस्थित होते. याशिवाय त्यांनी ११ किमीचा  चालकासोबत मेट्रोचा प्रवास करून रेल्वे चाचणी केली आहे.

या प्रकल्पाची बारकाईने अभ्यास व पाहणी करून कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत. याकडे विशेष लक्ष देवून अधिका-यांना सूचना दिल्या. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्ण करण्यासाठी त्यांनी थेट रेल्वे मंत्रालयाला पत्रव्यवहार करून तातडीने मंजूरी मिळावी अशी विनंती केली होती. अखेर हा प्रकल्प पुर्ण झाला असून आज सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो रेल्वे प्रवासी भाडे जाहीर केले. नागपूर येथील महामेट्रोकडे मेट्रोची जबाबदारी सिडकोने सोपविली आहे. यासाठी सहा महिने आधी महामेट्रोची निवड केली होती.

सिडको मेट्रो रेल्वेचे फेज १ चे प्रवासी भाडे (बेलापूर ते पेंधर)

किमी        भाडे
० ते २         १०
२ ते ४         १५
४ ते ६         २०
६ ते ८         २५
८ ते १०        ३०
१० च्या पुढे    ४०

हेही वाचलंत का? 

Back to top button